Stand Up India Yojna information in Marathi.
Stand Up India Yojna 2025 : केंद्र सरकारने 5 एप्रिल 2016 रोजी स्टँड अप इंडिया योजना सुरू केली आहे. देशभरातील महिला आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, SC आणि ST समुदायांमधील उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया, भारतमाला डिजिटल इंडिया, भारत नेट आणि उमंग यासारख्या प्रमुख सरकारी योजनेचे सक्षम आणि लाभार्थी असल्याने ही योजना स्टार्ट अप इंडिया सारखीच आहे. मात्र इथे काम वेगळ्या पद्धतीने चालते.
देशातील व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेला स्टँड अप इंडिया लोन स्कीम 2022 Stand up india Loan scheme 2022 या नावाने ही ओळखले जाते. या योजनेअंतर्गत तुम्हाला कुठल्या व्याजदरा अंतर्गत कर्ज मिळते. स्टँडअप इंडिया म्हणजे काय, त्याचे काय आहेत फायदे, काय आहेत उद्दिष्टे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय असेल पात्रता, यासाठी अर्ज कसा करावा आदि सर्व माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून आज पाहणार आहोत.
Stand up india yojna स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत SC, ST प्रवर्गातील व्यक्ती आणि 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या महिला उद्योजकांना या योजनेअंतर्गत केंद्र सरकार कर्ज अपलब्ध करून देत आहे. प्रत्येक बँकेद्वारे या योजनेअंतर्गत एका अनुसूचित जाती म्हणजे SC किंवा अनुसूचित जमाती ST व्यक्ती किंवा एका महिलेला कर्ज मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
या योजनेअंतर्गत ग्रीन फील्ड उभारण्यासाठी कर्ज दिले जाते. सुरुवातीला 10 लाख रुपयापर्यंत या कर्जाची रक्कम दिली जाते. उत्पादन, सेवा, कृषी संबंधित अपक्रम किंवा व्यवसाय क्षेत्रासाठी या योजनेअंतर्गत कर्ज अपलब्ध केले जाते. संबंधित व्यवसाय नॉन इंडिव्हिज्युअल इंटरप्राईज असेल तर 51% शेअर होल्डिंग आणि कंट्रोल शेअरिंग SC, ST व्यक्ती किंवा महिला उद्योजकाकडे असणे आवश्यक आहे.
What Is Stand Up India Yojna?
स्टँड अप इंडिया Stand up india अंतर्गत ज्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना भांडवल अपलब्ध करून देणे. आणि त्यांचा व्यवसाय वाढवा यासाठी त्यांना कमी व्याजदरात कर्जपुरवठा करणे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
गरीब आणि मागास वर्गातील लोकांना व्यवसायात आणण्यासाठी केंद्र सरकार ही योजना चालवत आहे. या योजनेअंतर्गत 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज दिले जाऊ शकते. या कर्जाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय मोठा करू शकता आणि आपली प्रगती करू शकता.
Stand up india yojana देशभरातील नागरिकांना सक्षम बनवणे आणि त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी केंद्र सरकार स्टँड अप इंडिया चालू होत आहे. ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकासमोर उद्योग उभारणी कर्ज आणि व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यक सर्व ती मदत सरकार करते.
केंद्र सरकार देशातील आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना विविध प्रकारच्या योजनातून आर्थिक मदत करत असते. याद्वारे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करू स्वतःच्या पायावर उभा करता येईल हा सरकारचा उद्देश आहे. 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज त्यांना स्टार्ट अप इंडिया लोन स्कीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योजनेतून दिले जाते. ते विशेष करून वंचित प्रवर्गातील उमेदवारांसाठी अपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत प्राधिकरण एकूण प्रकल्प खर्चाच्या 75 टक्के कव्हर करतील आणि उद्योजकाला एकूण खर्चाच्या 10 टक्के खर्च करावे लागेल.
देशातील उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना 2016 मध्ये सुरू केलेली आहे याद्वारे 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. हे कर्ज अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आणि महिला व्यावसायिकांना दिले जाते वर्गातील लोकांचा व्यवसाय वाढवणे आणि त्यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार हे कर्ज देत असते.
Stand up india yojana स्टँड अप इंडिया योजनेचे उद्दिष्ट म्हणजे 10 लाख हे संयुक्त बँक कर्ज आणि 1 कोटी ग्रीन फिल्ड इंटरप्राईजेच्या स्थापनेसाठी किमान एक SC, ST कर्जदार, एक महिला कर्जदाराला प्रति बँक शाखा या इंटरप्राईजेसची स्थापना यापैकी कोणत्या क्षेत्रात केली जाऊ शकते.
ठळक मुद्दे :
स्टँड अप इंडिया योजना म्हणजे काय
स्टँड अप इंडिया योजनेची थोडक्यात माहिती
स्टँड अप इंडिया योजनेचे उद्दिष्टे
स्टँड अप इंडिया योजनेची वैशिष्ट्ये
स्टँड अप इंडिया योजनेचे फायदे
स्टँड अप इंडिया योजनेचे पात्रता
स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत कर्ज देणारे देणाऱ्या बँकांची नावे
स्टँड अप इंडिया योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
स्टँडअप इंडिया योजनेचा अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत
FAQ’s
कन्यादान योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/kanyadan-yojna-maharashtra/
रोजगार संगम योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/rojgar-sangam-yojna-update/
Stand Up India Yojna in Short.
योजनेचे नाव:-स्टँड अप इंडिया योजना
कोणी सुरू केली:-केंद्र सरकार
लाभ:-1 कोटी रुपयापर्यंतचे कर्ज
लाभार्थी:-अनुसूचित जाती, जमाती आणि महिला
अर्ज प्रक्रिया:-ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट:-https://www.standupmitra.in
Stand Up India Yojna
Stand Up India Yojna Purpose.
किमान एक अनुसूचित जाती आणि जमाती कर्जदार तसेच किमान एक महिला कर्जदार यांना 10 लाख ते 1 कोटी रुपये पर्यंतचे बँक कर्जाची सुविधा देणे हे या स्टँड अप इंडिया योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे.
ग्रीन फील्ड फॉर्म स्थापन करण्यासाठी प्रत्येक बँकेच्या शाखेत एक SC, ST कर्जदार आणि एक महिला कर्जदार असावी.
ही कंपनी उत्पादन सेवा व्यापार उद्योगात असू शकते वैयक्तिक कंपन्यांमध्ये कमीत कमी 51% शेअर होल्डिंग आणि कंट्रोलिंग स्टिक आणि महिला उद्योजकांकडे असणे आवश्यक आहे.
Stand up india या योजने दरम्यान दिले जाणारे कर्ज हे खूप कमी व्याज दराने प्रदान केले जाईल. यामुळे कर्जाची परतफेड लाभार्थी सहजपणे करू शकतील.
लाभार्थी हे विविध क्षेत्रातील उत्पादन आणि विविध विभागांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.
देशातील महिला आणि मागासवर्गीय प्रगतिशील करणे हा Stand up india या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
त्यांच्या उद्योजकतेला चालना मिळेल.
स्टँड अप इंडिया Stand up india योजनेअंतर्गत आर्थिक मदत करून त्यांचा व्यवसाय सुरू करण्याची संधी सरकार देत आहे.
ज्या नागरिकांना आपला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना या योजने अंतर्गत बँकेकडून कर्ज अपलब्ध होणार आहे.
ज्यांना व्यवसाय, उत्पादन आणि सेवा क्षेत्रांशी संबंधित नवीन व्यवसाय उभा करायचा आहे. त्यांनाच स्टँड अप इंडिया योजनेचा Stand up india yojna लाभ मिळेल.
कर्जाची रक्कम ही दहा लाख ते एक कोटी रुपये पर्यंत असू शकते त्यामध्ये सर्व बँका शाखांनी कमीत कमी एक महिला उद्योजक आणि SC, ST नवउद्योजकांना स्टार्ट अप इंडिया योजनेअंतर्गतचे कर्ज दिले पाहिजे.
Stand Up India Yojna Features.
स्टँड अप इंडिया Stand up india योजनेअंतर्गत मुदतीचे कर्ज आणि ऑपरेटिंग भांडवलासह दहा लाख ते एक कोटी रुपये पर्यंतचे संमिश्र कर्ज मिळते. महिला उद्योजकांना SC, ST यांना त्यांच्या व्यापार उद्योगात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेतून कर्ज मिळू शकते.
मुदत ठेवीवर कर्ज आणि खेळते भांडवल प्रकल्प यांच्या खर्चाच्या 75 टक्के कव्हर करणारे कर्ज या योजनेअंतर्गत मिळते.
या योजनेअंतर्गत कर्ज घेताना बँकेतील सर्वात कमी व्याजदर लागू होतो.
स्टँड अप इंडिया कर्जासाठी Stand up india Loan yojana क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम मधून हमीद्वारे देखील कर्ज सुरक्षित केले जाते.
या योजनेअंतर्गत कर्जदाराच्या सुविधेसाठी रूपे डेबिट कार्ड करण्यात येईल.
तसेच दहा लाखापर्यंतचे भांडवल काढले जाऊ शकते.
दहा लाख रुपये पेक्षा जास्त खेळते भांडवलची मर्यादा कॅश क्रेडिट द्वारे होईल.
केंद्र आणि राज्य योजनांच्या सहयोगाने स्टॅंडर्ड इंडिया योजनेत 25% मार्जिन घटकाची कल्पना आहे अशा योजनांचा वापर हा पात्र सबसिडी मिळविण्यासाठी केला जाऊ शकतो. किंवा मार्जिन मनीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनांचा वापर होऊ शकतो परंतु तरीही कर्जदाराने सर्व परिस्थितीमध्ये स्वतःचे योगदान म्हणून प्रकल्प खर्चाच्या किमान दहा टक्के योगदान द्यावे.
Stand Up India Yojna Benefits.
स्टँडअप इंडिया Stand up india योजनेचे फायदे खालील प्रमाणे :
देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि तसेच नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देणे.
सल्लागारांना पोस्ट सेटअप मदत देखील देते.
स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत जे कर्ज Stand up india Loan yojna घेतले जाते त्या कर्जदारांना टेन्शन घ्यायचे काम नाही. कारण याचा परतफेड कालावधी हा 7 वर्षांचा आहे.
जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला स्टँड अप इंडिया योग्य व्यासपीठ देते. ज्या ठिकाणी तुम्हाला व्यवसायिक, सल्ला, वेळ आणि कायद्या बद्दलचे ज्ञान प्राप्त होते.
स्टँड अप इंडिया Stand up india yojna योजनेमुळे ऑपरेशनल उद्योजकांसाठी कायदेशीर आणि इतर संस्थात्मक अडथळे दूर करण्यास मदत होते.
मेक इन इंडिया यासारख्या सरकारी योजनांसाठी प्रेरणाशक्ती म्हणून काम करू शकते.
बँक खाते आणि तांत्रिक शिक्षणात प्रवेश मिळाल्याने समाजाच्या या स्तरांचा आर्थिक आणि सामाजिक समावेश होईल.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वेगवेगळे लाभ मिळतात ज्या द्वारे त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय वाढवता येतो.
गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची एक नवीन संधी अपलब्ध होते.
स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा लाख रुपये ते एक कोटी रुपये पर्यंत ची आर्थिक मदत केली जाते.
स्टँड अप इंडिया Stand up india द्वारे कसा व्यवसाय करायचा याचे सुरुवातीला प्रशिक्षण दिले जाते त्यासोबतच पुढील दोन वर्षांसाठी मदत केली जाते.
Stand Up India Yojna Eligibility.
अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
अर्जदार हा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड LLP किंवा भागीदारी फर्म मध्ये असणे आवश्यक आहे.
त्याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल ही 25 कोटींपेक्षा कमी असावी.
अर्जदार उद्योजक ही एक तर महिला किंवा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील व्यक्ती असावी.
ग्रीनफिल्ड प्रकल्पांना निधी देण्यासाठीच कर्ज दिले जाईल म्हणजेच उत्पादन किंवा सेवा क्षेत्रात सुरू केलेला हा पहिलाच प्रकल्प असावा.
उद्योजकाचा व्यवसाय हा खासगीरीत्या आयोजित कंपनी LLP किंवा सहयोग असणे आवश्यक आहे.
अर्जदार हा कोणत्याही संस्थेचा डिफॉल्टर नसावा तसेच बँकेचाही डिफॉल्टर नसावा.
Open किंवा इतर प्रवर्गातील उमेदवारांना स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घेता येणार नाही. स्टॅंड अप इंडिया Stand up india योजनेचा लाभ हा अपवादात्मक परिस्थितीमध्ये इतर प्रवर्गातील उमेदवारांना घेता येतो म्हणजेच कंपनी मध्ये किंवा व्यवसायामध्ये महिला किंवा SC, ST प्रवर्गातील उमेदवाराची भागीदारी सर्वात जास्त असावी.
Stand Up India Yojna.
स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत कर्ज देणारे देणाऱ्या बँकांची नावे.
स्टेट बँक ऑफ इंडिया
ॲक्सिस बँक
इंडियन बँक
बँक ऑफ बडोदा
इंडियन बँक ऑफ इंडिया
जम्मू आणि काश्मीर बँक
बँक ऑफ महाराष्ट्र
पंजाब अँड सिंध बँक
कॅनरा बँक
पंजाब नॅशनल बँक
सेंट्रल बँक ऑफ इंडिया
आय सी आय सी आय बँक
युनियन बँक ऑफ इंडिया
आयडीबीआय बँक
युको बँक
Stand Up India Yojna Documents.
अर्जदाराचे आधार कार्ड
कंपनी किंवा व्यवसायाचा पत्ता
रहिवाशी प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
कंपनी किंवा व्यवसायाचा आयकर अहवाल
जात प्रमाणपत्र
व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
याशिवाय बरेच कागदपत्रे या योजनेसाठी लागतात लागू शकतात. ती कागदपत्रे तुमच्या कंपनी व्यवसायावरून आणि कंपनी वरून ठरविले जातात.
महिला बचत गट लोन योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/mahila-bachat-gat-loan-yojna/
कूकुट पालन योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/kukut-palan-yojna/
Stand up india yojna Online Apply.
स्टँड अप इंडिया योजनेचा Stand up india ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्टँड अप इंडिया योजनेच्या https://www.standupmitra.in
या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम तुम्ही अधिकृत वेबसाईटला जा
त्यात तुम्हाला Apply for Loan हा पर्याय दिसेल.
त्या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर अर्जाचा फॉर्म दिसेल.
त्यामध्ये तुम्हाला तीन श्रेणी दिसतील त्यात new entrepreneur
Existing entrepreneur
Self Employed Professional
यापैकी तुम्हाला ज्या श्रेणीत अर्ज करायचा आहे ती श्रेणी निवडा.
त्यामध्ये तुमचे नाव, ईमेल आयडी तसेच संपूर्ण माहिती भरा आणि जनरेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला आता लॉगिन करावे लागेल.
लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म उघडेल तो फॉर्म संपूर्ण वाचून त्या मध्ये विचारलेली माहिती अचूकपणे भरा.
त्यानंतर त्या सोबत लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
आणि त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही स्टँड अप इंडिया योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
FAQ’s
स्टँड अप इंडिया योजनेचा कोणाला मिळतो लाभ?
देशातील अनुसूचित जाती जमाती तसेच सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.
स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत किती रकमेचे कर्ज मिळू शकते?
स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 10 लाख रुपये पासून ते 1 कोटी रुपया पर्यंतचे कर्ज मिळते.
स्टँड अप इंडिया योजनेचा कसा करावा अर्ज?
स्टँड अप इंडिया योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल त्याची वेबसाईट अधिकृत वेबसाईट https://www.standupmitra.in ही आहे.
स्टँड अप इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया योजनेत काय फरक आहे?
स्टँड अप इंडिया योजना ही SC, ST, महिला उद्योजकांना ग्रीन फील्ड प्रकल्प उभारण्यात आर्थिक मदत करते, तर स्टार्ट अप इंडिया योजना नवीन आणि सध्याच्या व्यवसायांसाठी सर्जनशील आणि तंत्रज्ञानाचे नेतृत्वाखाली कंपन्यांना प्रोत्साहन देते.