Kanyadan Yojna information in Marathi
Kanyadan Yojna Maharashtra 2025-: महाराष्ट्र सरकार गरीब, शेतकरी, विद्यार्थी, मुली आदींसाठी नवनवीन योजना राबवत असते. आज आपण या लेखातून महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी एक योजना सुरू केली आहे ती योजना बघूया तिचे नाव आहे कन्यादान योजना.
Kanyadan Yojna Maharashtra सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने कन्यादान योजना महाराष्ट्र सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे नवविवाहित जोडप्यांना आर्थिक सहाय्य करणे. हा एक सामाजिक कल्याण कार्यक्रम सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्याद्वारे चालवला जातो. या कार्यक्रमामुळे ज्या कुटुंबाचे उत्पन्न आहे कमी आहे, त्या कुटुंबातील नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या गरजेचे भेटवस्तू आणि आर्थिक सहाय्य मिळते. राज्यातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा कार्यक्रम सुरू केला.
Kanyadan Yojna Maharashtra महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंब, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, मागासवर्गीय यांच्यासाठी शासनाने महाराष्ट्र कन्यादान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीला लग्न झाल्यावर तिला सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. ती मदत 10 हजार रुपये होती. त्यामध्ये आता वाढ होऊन ती 25 हजार रुपये करण्यात आली आहे.
Kanyadan Yojna आजच्या लेखात आपण महाराष्ट्र कन्यादान योजना म्हणजे काय?, महाराष्ट्र कन्यादान योजनेचे लाभ, फायदे काय?, कन्यादान योजनेचे उद्दिष्टे, पात्रता, वैशिष्ट्ये काय?, महाराष्ट्र कन्यादान योजनेसाठी कोण करू शकेल अर्ज? याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या लेखात आपण पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Kanyadan Yojna .
What is mean by Kanyadan Yojna.
Kanyadan Yojna Maharashtra लग्न सोहळा म्हटला की सर्वप्रथम विषय निघतो तो पैशांचा आणि पारंपारिक पद्धतीने लग्न करण्याचा. जर पारंपारिक पद्धतीने लग्न करायचे असेल तर त्यासाठी खर्चही भरपूर लागतो. सध्याच्या काळात असे झाले आहे की, हा खर्च मुलीकडच्या व मुलीकडच्या कुटुंबाने अर्धा अर्धा करत आहेत. कुटुंबातील लग्न हे कुणालाही ओझे वाटू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने कन्यादान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पूर्वी सरकार मार्फत 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात होती ती वाढवून आता 25,000 रुपये करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ हा भटक्या जाती, विमुक्त जमाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय यांना होणार आहे.
Maharashtra Kanyadan Yojna सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाद्वारे चालवली जाणारी एक समाज कल्याण योजना म्हणजेच महाराष्ट्र कन्यादान योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, विमक्त जाती, भटक्या जमाती, मागासवर्गीय, गरीब कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी 25 हजार रुपयांची सरकारकडून आर्थिक मदत मिळेल. या योजने अंतर्गत महाराष्ट्र कन्यादान योजनेचे उद्दिष्ट हे नवविवाहित जोडप्यांना आर्थिक मदत करणे हे आहे. गरीब कुटुंबाला त्यांच्या मुलीच्या लग्नाचा खर्च हा न परवडणारा असतो.
आपण पाहतो की लग्न म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्ट येते जसे की कपडे, दागिने, विधी, पारंपारिक पद्धतीने केला जाणारा विवाह ही सर्व गरीब कुटुंबाला परवडत नाही. त्यासाठी आर्थिक मदत म्हणून सरकार 25,000 ची मदत तसेच काही उपयुक्त भेटवस्तू नवविवाहित जोडप्यांना देणार आहे. कोणत्याही सामान्य कुटुंबातील घरात लग्न सोहळा असा विषय निघाला तर सर्वात आधी अडचण येते ती पैशांची प्रत्येक समाजातील कुटुंबांना त्यांच्या परंपरेनुसार विवाह सोहळा पार पाडावा लागतो.
लग्न म्हटले की हजारो, लाखो रुपयांचा खर्च आला आणि त्यातही मुलीकडचं लग्न असेल तर जास्तच खर्च. अशावेळी मुलीच्या लग्नासाठी त्यांच्या आई-वडिलांना बँकेतून कर्ज घ्यावे लागते आणि ते त्यांना न परवडणारे असते. या सर्व गोष्टींची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने कन्यादान योजना सुरू केली आहे.
Maharashtra Kanyadan Yojna महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कन्यादान योजनेची अंमलबजावणी केली जाते. लग्न सोहळ्यांमध्ये जास्तीचा खर्च केला जातो ते कमी करण्यासाठी सरकार नववाहीत जोडप्यांना 25 हजार रुपये आर्थिक मदत करणार असून या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूची जमाती, तसेच भटक्या जमाती, मागासवर्गीय कुटुंब जे जडपे असणार आहेत त्यांना सर्वांना या योजनेचा लाभ होणार आहे.
आपण पाहतो की भरपूर लग्न सोहळे आहेत की जे सामुदायिक लग्न सोहळ्या पद्धतीने केले जाते. या सामुदायिक लग्न सोहळ्यामध्ये जे जोडपे सहभागी होतात त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासन तर्फे 10 हजार रुपये मिळत होते आणि जे स्वयंसेवी संस्था आयोजित करत होते त्यांना प्रत्येकी जोडप्या मागे 2 हजार रुपये असे मिळत होते. तर आता ही रक्कम 10 हजार वरून 25 हजार रुपये केली गेली आहे.
रोजगार संगम योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/rojgar-sangam-yojna-update/
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/sharad-pawar-gram-samriddhi-yojna/
Kanyadan Yojna ठळक मुद्दे :
कन्यादान योजना महाराष्ट्र म्हणजे काय
What Is Kanyadan Yojna
कन्यादान योजनेची थोडक्यात माहिती
Kanyadan Yojna Maharashtra In Short
कन्यादान योजनेचे फायदे
Kanyadan Yojna Maharashtra Benefits
कन्यादान योजनेचे उद्दिष्टे
Kanyadan Yojna Maharashtra Purpose
कन्यादान योजनेची वैशिष्ट्ये
Kanyadan Yojna Maharashtra Features
महाराष्ट्र कन्यादान योजनेसाठी पात्रता
Maharashtra Kanyadan Yojna Eligibility
कन्यादान योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे
Kanyadan Yojna Maharashtra
कन्यादान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
Kanyadan Yojna Maharashtra Documents
महाराष्ट्र कन्यादान योजनेची अर्ज प्रक्रिया
Kanyadan Yojna Maharashtra Application Form
महाराष्ट्र कन्यादान योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
Kanyadan Yojna Maharashtra Apply
कन्यादान योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Kanyadan Yojna Maharashtra Online Apply
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
Kanyadan Yojna in Short
योजनेचे नाव:-कन्यादान योजना महाराष्ट्र
कोणी सुरू केली:-महाराष्ट्र शासन
विभाग:-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
फायदा:-लग्नासाठी आर्थिक मदत करणे
लाभ रक्कम:-25 हजार रुपये
अर्ज प्रक्रिया:-ऑफलाइन आणि ऑनलाइन
अधिकृत वेबसाईट:-https://sjsa.maharashtra.gov.in
Kanyadan Yojna Maharashtra Benefits.
या योजनेअंतर्गत नवविवाहित जोडप्यांना 25 हजार रुपये रक्कम आर्थिक मदत म्हणून मिळणार आहे.
या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय इत्यादी लाभार्थी जोडप्यांना मिळणार आहे.
Kanyadan Yojna Maharashtra Purpose.
देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, विमुक्त जमाती अशा कुटुंबातील मुलीच्या लग्नाला आर्थिक मदत करण्यासाठी कन्यादान योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेमुळे लग्नात होणाऱ्या अवाढव्य खर्चावर नियंत्रण राहते.
या योजनेमुळे पारंपारिक पद्धतीने विवाह पार पडतो.
सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन प्रवृत्त केले जाते यामुळे त्यांच्या कुटुंबावर होणारा अवाढव्य खर्चावर नियंत्रण राहते.

Kanyadan Yojna .
Kanyadan Yojna Maharashtra Features.
Kanyadan Yojna कन्यादान योजनेअंतर्गत राज्यातील मागासवर्गातील वधूवरांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते.
या योजनेमुळे अनावश्यक खर्च कमी होऊन सामूहिक विवाह सोहळ्यास प्रोत्साहन मिळते.
या योजनेअंतर्गत पूर्वी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जात होती. त्यामध्ये आता वाढ होऊन ती 25 हजार रुपये पर्यंत गेली आहे.
या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत ही मुलीच्या लग्नानंतर तिच्या पालकांच्या नावाने धनादेश द्वारे मिळते.
या योजनेमुळे मुलीच्या कुटुंबाला तिच्या लग्नासाठी कुणाकडून नाही कर्ज घेण्याची आवश्यकता नाही.
Maharashtra Kanyadan Yojna Eligibility .
Kanyadan Yojna योजनेचा लाभ घेण्यासाठी वधू आणि वर हे महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असावेत.
मुलाचे वय 21 वर्ष तर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
वधू आणि वर हे दोन्ही किंवा त्या दोघांपैकी एक कुणीही अनुसूचित जाती, विमुक्त जाती किंवा इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्गातील असावे.
कन्यादान योजनेचा Kanyadan Yojna लाभ हा फक्त वधूवरांच्या प्रथम विवाह साठीच दिला जाईल.
बालविवाह प्रतिबंध कायदा, हुंडा प्रतिबंध कायदा या अंतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग यांच्याकडून झालेला नसावा. तसे त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.
सामूहिक विवाह सोहळ्यात कमीत कमी 10 जोडप्यांनी विवाह समारंभ पार पाडावे.
वधू किंवा वर या दोघांपैकी कोणाच्याही कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावा.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
कन्यादान योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे.
कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी वधू किंवा वराचे वय कमी असेल तर अर्ज रद्द होतो.
वधू किंवा वर या दोघांपैकी कोणीही मागास प्रवर्गातील नसेल तर अर्ज रद्द होतो.
वधू किंवा वर हे दोघेही महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी नसतील तर अर्ज रद्द होतो.
वधू किंवा वर या दोघांपैकी कोणाच्याही कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत असेल तर अर्ज रद्द होतो.
Kanyadan Yojna Maharashtra Documents.
वधू-वरांचे आधार कार्ड
विवाह नोंदणी प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
विहित नमुन्यातील अर्ज.
दीनदयाल अंत्योदय योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/dindayal-antyoday-yojna/
गोबर धन योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/gobar-dhan-yojana/
Kanyadan Yojna Maharashtra Application Form.
महाराष्ट्र कन्यादान योजनेचा अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो. सर्वप्रथम आपण ऑफलाइन पद्धत पाहू.
महाराष्ट्र कन्यादान योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
Kanyadan Yojna Maharashtra Apply
महाराष्ट्र कन्यादान योजनेचा Maharashtra Kanyadan Yojna लाभ घेण्यासाठी तुमच्या संबंधित स्वयंसेवी संस्थेने समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कडे अर्ज करावा.
अर्जामध्ये संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
त्यासोबतच कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवावा.
त्यानंतर विवाह संपन्न झाल्यावर वधू वर किंवा सामूहिक विवाह संस्था यांच्यामार्फत समाज कल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठविला जातो.
त्यानंतर संबंधित जोडप्यांना तसेच त्या संस्थेला महाराष्ट्र शासनाद्वारे अनुदान दिले जाते.
Kanyadan Yojna Maharashtra Online Apply.
कन्यादान योजनेचा Kanyadan Yojna अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत वेबसाईट भेट द्यावी लागेल.
त्यानंतर मुख्यमंत्री कन्यादान योजनेची संबंधित काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ते डाऊनलोड करून संपूर्ण सूचना वाचून घ्याव्या लागतील.
त्यानंतर लॉगिन आयडी करावा लागेल.
त्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या मुख्यमंत्री कन्यादान योजना हा पर्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये नवीन वापर करता म्हणून नोंदणी करा.
त्यानंतर तुमच्या समोर अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.
त्यानंतर अर्ज सबमिट करून अर्जाची प्रिंट आऊट घ्या.
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कन्यादान योजनेचा अर्ज करू शकता.
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
प्रश्न: महाराष्ट्र कन्यादान योजना कोणी सुरू केली?
उत्तर: Maharashtra Kanyadan Yojna महाराष्ट्र कन्यादान योजना ही महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत सुरू केली.
प्रश्न: महाराष्ट्र कन्यादान योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
उत्तर: महाराष्ट्र कन्यादान योजनेचा Kanyadan Yojna Maharashtraलाभ हा भटक्या जमाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, विशेष मागासवर्गीय तसेच आदिवासी समाजाच्या लाभार्थी नवविवाहित जोडप्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
प्रश्न: महाराष्ट्र कन्यादान योजनेअंतर्गत लाभ रक्कम किती मिळते?
उत्तर: महाराष्ट्र कन्यादान योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे 25 हजार रुपयांच्या आर्थिक मदत मिळते.
प्रश्न: महाराष्ट्र कन्यादान योजनेसाठी वयाची अट काय आहे?
उत्तर: महाराष्ट्र कन्यादान योजनेअंतर्गत वधूचे वय 18 वर्षे पूर्ण असावे, तर वराचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
प्रश्न: महाराष्ट्र कन्यादान योजनेचा कसा करावा अर्ज?
उत्तर: महाराष्ट्र कन्यादान योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागतो. तुमच्या संबंधित स्वयंसेवी संस्था समाज कल्याण सहाय्यक आयुक्ताकडे जाऊन हा अर्ज करावा लागतो.