Shravan Bal Yojna information in Marathi 2024.
Shravan Bal Yojna Maharashtra 2024: महाराष्ट्र शासन नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. अशाच आज आपण एका योजनेची माहिती पाहणार आहोत काही योजना महिलांसाठी, तर काही योजना विद्यार्थ्यांसाठी, तर काही योजना शेतकऱ्यांसाठी, तर काही योजना वृद्धांसाठी म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांसाठी. अशाच आज आपण एका योजनेची माहिती पाहणार आहोतती म्हणजे श्रावण बाळ योजना. महाराष्ट्र राज्यातील निराधार आणि वृद्ध नागरिकांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून श्रावण बाळ योजना Shravan Bal Yojana सुरू करण्यात आली. या माध्यमातून राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना दरमहा निवृत्ती वेतन देण्यात येते. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच ज्यांचे वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्या वृद्ध नागरिकांना सरकारमार्फत आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळात आर्थिक मदत करणे जेणेकरून ते त्यांचे दैनंदिन जीवन गरजा भागवण्यासाठी कोणावरही अवलंबून राहणार नाहीत हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमुळे वृद्ध नागरिक सशक्त तसेच आत्मनिर्भर बनतील व त्यांचा आर्थिक विकास होईल.
Shravan Bal Yojna 2024 महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंबे हे दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते. त्यांना त्यांचे दैनंदिन जीवन जगणे देखील हालाखीचे असते. अशा कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींना त्यांच्या वृद्धपकाळात औषधोपचाराचा खर्च परवडणारा नसतो. त्यांच्या घरातील वृद्ध व्यक्तीकडे दुर्लक्ष होते वृद्धपकाळात वृद्ध व्यक्तींकडे कमाईचे साधन नसते, त्यामुळे त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागते. त्यांच्या मुलावर मुलीवर सुनेवर किंवा घरातील एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. परंतु त्यांच्या घरची परिस्थिती हलकीसची असल्यामुळे त्यांना औषध उपचाराचा खर्च आवाक्याचा असतो त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना समाजात जगणे कठीण होते. त्यांच्याकडे कुठलीही आर्थिक पाठबळ नसते. अशाच वयोवृद्ध नागरिकांचा आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यातील वयोवृद्ध नागरिकांसाठी म्हणजेच 65 वर्षांच्या वरील नागरिकांसाठी व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या या कुटुंबातील व्यक्तीसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी नागरिकांना दरमहा 400 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते. त्याचप्रमाणे लाभार्थी नागरिकाला केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दरमहा 200 रुपये दिले जाते. असे एकूण 600 रुपये दरमहा लाभार्थ्याला आर्थिक मदत सरकारमार्फत केली जाते. श्रावण बाळ योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांना प्रोत्साहन देणे त्यांना आर्थिक पाठबळ देणे हा आहे.
श्रावण बाळ योजनेचा Shravan Bal Yojna लाभ हा 65 वर्षावरील नागरिकांना होणार आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना 1500 रुपये दरमहा आर्थिक मदत केली जाणार आहे. यामुळे वृद्ध नागरीक हे त्यांचे राहिलेले जीवन अत्यंत आनंदाने जगतील त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कुणाजवळही हात पसरवायची किंवा कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. ते त्यांचा खर्च स्वतः करू शकतील. श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेअंतर्गत वृद्ध नागरिकांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
आजच्या लेखात आपण श्रावण बाळ योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. श्रावण बाळ योजना म्हणजे काय?, श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेचे काय आहेत लाभ, फायदे, वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेची काय आहे पात्रता?, श्रावण बाळ योजनेसाठी योजनेचा अर्ज करण्यासाठी काय आहेत आवश्यक कागदपत्रे?, श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजनेसाठी कसा करावा अर्ज?, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या लेखात पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Shravan Bal Yojna 2024
Shravan Bal Yojna ठळक मुद्दे :
श्रावण बाळ योजना 2024 मराठी माहिती
Shravan Bal Yojna 2024 Information In Marathi
श्रावण बाळ योजनेची थोडक्यात माहिती
Shravan Bal Yojna In Short
श्रावण बाळ योजनेचे उद्दिष्ट
Shravan Bal Yojna Purpose
श्रावण बाळ योजनेची वैशिष्ट्ये
Shravan Bal Yojna Features
श्रावण बाळ योजनेचे फायदे
Shravan Bal Yojna Benefits
श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेसाठीची पात्रता
Shravan Bal Yojna Eligibility
श्रावण बाळ योजनेची आवश्यक कागदपत्रे
Shravan Bal Yojna Documents
श्रावण बाळ योजनेची अर्ज प्रक्रिया
Shravan Bal Yojna Apply
श्रावण बाळ योजनेचा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Shravan Bal Yojna Online Application
FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न.
SBI स्त्री शक्ती योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/sbi-stree-shakti-yojna/
बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/beti-bachao-beti-padhao-yojna/
Shravan Bal Yojna in short
योजनेचे नाव:-श्रावण बाळ योजना
कोणी सुरू केली:-महाराष्ट्र सरकार
लाभ रक्कम:-1500 रुपये प्रतिमहा आर्थिक मदत
लाभार्थी:-गरीब कुटुंबातील वृद्ध नागरिक
उद्देश:-राज्यातील वृद्ध व्यक्तींना दरमहा निवृत्ती वेतन देणे
अर्ज प्रक्रिया:-ऑनलाइन आणि ऑफलाइन
वेबसाईट https://aaplesarkar.mahaonline.gov.in/
Shravan Bal Yojna Purpose.
श्रावण बाळ योजना ही महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना 65 वर्षांवरील नागरिकांना आर्थिक मदत करून त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेमुळे राज्यातील वृद्ध नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
वृद्ध नागरीक यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
वृद्ध नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
राज्यातील वृद्ध नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळात दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहतील.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाच्या रकमेतून ते त्यांचा दैनंदिन उदरनिर्धारनिर्वाह करतील.
राज्यातील वयोवृद्ध नागरिक या योजनेमुळे स्वावलंबी जीवन जगतील.
या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील वृद्ध नागरिक आत्मनिर्भर बनतील.
Shravan Bal Yojna features.
Shravan Bal Yojna श्रावण बाळ योजनेची सुरुवात ही महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेली महत्त्वकांक्षी योजना आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
राज्यातील वयोवृद्ध व्यक्ती या योजनेमुळे सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
श्रावणबाळ योजनेमुळे राज्यातील वयोवृद्ध नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
या योजनेमुळे वयोवृद्ध नागरिकांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
Shravan Bal Yojna श्रावणबाळ योजनेची अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोप्या पद्धतीने केली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही.
या योजनेअंतर्गत दिला जाणारी लाभाची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या साह्याने थेट जमा केली जाईल.
Shravan Bal Yojna benefits.
श्रावण बाळ योजना Shravan Bal Yojna योजनेमुळे वृद्ध नागरिक यांचा आर्थिक सामाजिक विकास होईल.
श्रावणबाळ योजनेमुळे वृद्ध नागरिक त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहून सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
या योजनेमुळे वयोवृद्ध नागरिकांना आर्थिक पाठबळ मिळेल.
या योजनेअंतर्गत वृद्ध नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळात त्यांचे जीवन जगणे सोपे जाईल त्यांना कुणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येईल.
महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21000 पेक्षा कमी आहे अशा वृद्ध नागरिकांना राज्य सरकार मार्फत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत प्रतिमा 1500 रुपये आर्थिक मदत केली जाईल.
Shravan Bal Yojna Eligibility.
1)श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेच्या अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी.
2)अर्जदार व्यक्तीचे वय हे 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
3)महाराष्ट्र बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
4)अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21 000 पेक्षा जास्त नसावे.
5)अर्जदार कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नसावा.
6)अर्जदार व्यक्ती हा किमान पंधरा वर्षे तरी मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
7)या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला कोणत्याही अपत्य संख्येची अट नाही.
8)ज्या नागरिकांचे वय 65 वर्षाखालील आहे त्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
9)या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असावे.

Shravan Bal Yojna 2024.
Shravan Bal Yojna Documents Required.
1)अर्जदाराचे आधार कार्ड
2)अर्जदाराचे पॅन कार्ड
3)मतदान कार्ड
4)अर्जदाराचे ज्येष्ठ नागरिक कार्ड
5)अर्जदाराचे जन्म प्रमाणपत्र
6)रहिवाशी प्रमाणपत्र
7)रेशन कार्ड
8)उत्पन्नाचे प्रमाणपत्र
9)मोबाईल नंबर
10)पासपोर्ट आकाराचा फोटो.
वन स्टूडेंट वन लॅपटॉप योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/one-student-one-laptop-yojna/
पीएम कौशल विकास योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-kaushal-vikas-yojna/
Shravan Bal Yojna Apply.
श्रावणबाळ योजनेचा अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो सर्वप्रथम आपण श्रावण बाळ योजनेचा ऑफलाइन पद्धतीने कसा करावा अर्ज ही माहिती पाहू
Shravan Bal Yojna श्रावणबाळ योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम त्याच्या जवळील जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तहसील संजय गांधी योजना किंवा तलाठी कार्यालयामध्ये जावे लागेल
तेथील अधिकाऱ्यांकडून श्रावणबाळ योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल
अर्ज सोबत आवश्यकती कागदपत्रे जोडावे लागतील
त्यानंतर अर्ज व आवश्यक कागदपत्रे दोन्ही अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागेल
अशा प्रकारे तुम्ही या अत्यंत सोप्या पद्धतीने श्रावण बाळ योजनेचा अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता
श्रावण बाळ योजनेचा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
Shravan Bal Yojna Online Application
Shravan Bal Yojna श्रावण बाळ योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
अधिकृत वेबसाईटवर जाताच तुमच्या समोर होम पेज दिसेल
त्यामध्ये तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यापैकी एक पर्याय निवडा
जर तुम्ही पर्याय क्रमांक 1 निवडला तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि जिल्हा निवडावा लागेल तसेच युजर आयडी आणि पासवर्ड मिळवावा लागेल
जर तुम्ही पर्याय क्रमांक 2 निवडला तर तुम्हाला तेथे एक अर्ज दिसेल त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला अचूकपणे भरावी लागेल. जसे की अर्जदाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, युजरनेम, पत्त्याचा फोटो इत्यादी माहिती भरावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करावे लागेल
त्यानंतर अर्ज प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड तेथे टाकून कॅपच्या कोड लिहावा लागेल
त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल आणि त्यानंतर तुमच्या आपले सरकार या पोर्टलवर लॉगिन होईल
त्यानंतर श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज करता येईल
यासाठी तुम्हाला तुमच्यासमोर पेज ओपन झालेल्या डाव्या मेनू साईड बार मधून संबंधित विभाग निवडावा लागेल
त्यामध्ये तुम्हाला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर श्रावण बाळ योजना हा पर्याय निवडा या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म दिसेल
त्यामध्ये तुमचे सर्व लॉगिन टाकून सबमिट या बटनवर क्लिक करा
लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्या अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी सर्व अचूकपणे भरा
त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा
त्यानंतर तुम्हाला बँकेची माहिती भरावी लागेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँकेचा IFSC कोड, ही संपूर्ण माहिती भरा
त्यानंतर तुम्ही तुमची माहिती अचूक भरली आहे ना याची खात्री करून घेऊन सबमिट या बटनवर क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल तो क्रमांक तुमच्याकडे नोंद करून ठेवा
अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या योजनेचा अर्ज करू शकता
श्रावणबाळ योजना हेल्पलाइन नंबर 1800 120 8040
FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न.
प्रश्न: श्रावणबाळ योजना ही कोणत्या राज्यासाठी आहे?
उत्तर: श्रावण बाळ योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्वकांक्षी योजना आहे.
प्रश्न: श्रावणबाळ योजनेचा कोणाला मिळतो लाभ?
उत्तर: श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ हा ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच ज्या नागरिकांचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो.
प्रश्न: श्रावणबाळ योजनेअंतर्गत किती मिळते लाभ रक्कम?
उत्तर: श्रावणबाळ योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत केली जाते.
प्रश्न: श्रावणबाळ योजनेचा कसा करावा अर्ज?
उत्तर: श्रावणबाळ योजनेचा अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने कर्ता येतो.