Sheli Palan Yojana Maharashtra
Sheli Palan Yojana Maharashtra 2024: महाराष्ट्र राज्यामध्ये खेडे भागात तसेच बऱ्याच ठिकाणी लोक हे पशुपालनाचा पारंपारिक पद्धतीने एक जोडधंद्या प्रमाणे किंवा पूर्ण वेळ पशुपालनाचा व्यवसाय करतात. पशुपालनामध्ये लोक हे शेळ्या मेंढ्या गाई म्हशी यांसारखे पशु पाळून त्यांच्या निघणाऱ्या दुधावरती त्यांच्या परिवाराचा व त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. खेडे भागामध्ये बरेच असे मध्यमवर्गीय कुटुंब असतात त्यांना दुधासाठी गाय म्हैस घेणे शक्य नसते त्यामुळे ते शेळी पाळतात. शेळीच्या माध्यमातून ते त्यांच्या दुधाच्या गरजा पूर्ण करतात तसेच त्यांचा उदरनिर्वाह या शेळी पालन व्यवसायातून होत असतो. शेळ्या व मेंढ्या पाळण्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात धनगर समाज हा प्रथम आहे त्यांच्या तुलनेत इतर समाजातील लोक हे एवढ्या जास्त प्रमाणात शेळ्या मेंढ्यांचे पालन करत नाहीत.

Sheli Palan Yojana Maharashtra 2024
लोक फक्त मोजक्याच शेळ्या पाळतात त्यात आपले शेतकरी बांधव येतात शेतकरी कुटुंब हे शेतीबरोबरच शेळीपालनाचाही व्यवसाय करतात.हळूहळू शेती व इतर जोडधंद्या बरोबरच शेळीपालन हा प्रमुख उद्योग बनला आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने काय शेळ्या व मेंढ्या पालनासाठी भक्कम आर्थिक अनुदान हे शेळ्या व मेंढ्या पालक शेतकरी व व्यावसायिकांना दिला आहे या अनुदानाच्या माध्यमातून ते पशुपालनाचा व्यवसाय हा उत्तम प्रकारे करू शकतात शिवाय त्यांना यामध्ये भरपूर अनुदान मिळत असल्यामुळे कमी पैश्यात जास्त पशु त्यांना पाळता येतात. Sheli Palan Yojana अंतर्गत जे शेतकरी किंवा इतर नागरिक शेळीपालनाचा उद्योग करू इच्छितात त्यांना सरकारद्वारे 75% टक्के अनुदान दिले जाते.
Sheli Palan Yojana Maharashtra online application:http://marathideliynews.com https://marathideliynews.com › … 75% अनुदान मिळणार, असा करा अर्ज | Sheli Palan Yojana Maharashtra …
Sheli Palan Yojana नेच्या माध्यामातून लोकांना सरकारद्वारे 75 टक्के रक्कम दिली जाते व लोकांना स्वतःला 25% टक्के रक्कम भरून शेळ्या विकत घेता येऊ शकतात याच्या माध्यमातून कुटुंबांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. राज्यात होणाऱ्या पशुपालनाच्या व्यवसायाला बळकट देऊन व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना स्वयंरोजगारीत करणे या पाठीमागचा सरकारचा उद्देश आहे तसेच जे नवीन लोकं किंवा तरुण वर्ग या व्यवसायामध्ये उतरण्यासाठी इच्छुक आहे त्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे तेही या Sheli Palan Yojana चा लाभ घेऊ शकतात.
Sheli Palan Yojana Maharashtra ठळक मुद्दे
योजनेचे नाव –शेळी पालन योजना 2024योजनेची सुरुवात –25 मे 2019 रोजीसुरुवात कोणी केली –महाराष्ट्र सरकार द्वारे ( कृषी विभाग महाराष्ट्र शासन )अनुदान –75% टक्के ते 50% टक्केकोणाला लाभ मिळणार –महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व नागरिकअर्ज करण्याची पद्धत –ऑफलाईन / ऑनलाईन
शेळी पालन योजनेच्या माध्यमातून जे कुटुंब अनुसूचित जाती जमाती मध्ये मोडतात या कुटुंबांना राज्य शासनाकडून 75 टक्के अनुदान दिले जाते. तसेच जे कुटुंब किंवा शेतकरी खुल्या प्रवर्गामध्ये येतात अशा सर्व कुटुंबांना 50% अनुदान दिले जाते त्याच्या माध्यमातून ते शेळ्या खरेदी करू शकतात.
अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंबासाठी शासन हे 75 टक्के रक्कम देते व राहिलेली 25% रक्कम ही त्या लाभ घेणाऱ्या नागरिकास भरावयाचे असते तसेच खुल्या प्रवर्गामध्येही 50 टक्के रक्कम हे शासन देते व 50 टक्के रक्कम ही लाभ घेणाऱ्या खोल्या प्रवर्गातील कुटुंबांना भरावयाची असते.
जे कास्तकार बांधव नागरिक या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्यांच्याकडे पुरेशी शेती जमीन असणे आवश्यक आहे कारण अनुदान अंतर्गत मिळालेल्या बकऱ्या व मेंढ्या यांचं पालन पोषण करण्यासाठी व त्यांना गोठा तयार करण्यासाठी त्या जमिनीचा उपयोग होईल त्यामुळे बाकीच्या सर्व बाबीं चा विचार करून नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज भरावा.
Sheli Palan Yojana उद्दिष्टे व धोरण
Sheli Palan Yojana Maharashtra पाठीमागची धोरणे व उद्दिष्टे कोणती ते खालील प्रमाणे,
शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना त्यांच्या इतर उद्योगा सोबतच शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
राज्यातील सर्व पशुपालन करणाऱ्या नागरिकांचे आर्थिक परिस्थिती उंचावणे.
ज्या नागरिकांकडे व शेतकऱ्यांकडे आर्थिक परिस्थिती नाही अशा सर्व शेतकऱ्यांना शेळी मेंढी पालन योजनेच्या माध्यमातून पैश्याची मदन देऊन त्यांना त्यांचा शेळीपालनाचा उद्योग करण्यास प्रेरित करणे.
नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या पशुधनापासून निघणाऱ्या दूध उत्पादनाचा दर्जा वाढवून त्यांना योग्य तो लाभ मिळवून देणे.
Sheli Palan च्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये शेती सोबतच जोड धंदा उभा करणे म्हणजेच शेतकऱ्यांना पूर्णपणे शेतीवर अवलंबून न राहता जोडधंद्यासोबतच त्यांचा उदरनिर्वाह करणे.
राज्यामध्ये दिवसान दिवस वाढणारी सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण शेळी पालन व्यवसाय सुरुवात करून युवकांनी करावे या पाठीमागे सरकार चा मुख्य उद्देश आहे.
तर ही होती शेळी पालन योजने विषयक धोरणे व उद्दिष्टे.
Sheli Palan Yojana होणारे फायदे
Sheli Palan Yojana Maharashtra: शेळी पालन योजना योजनेच्या माध्यमातून शेतकरी व तसेच राज्यातील युवकांना कोणकोणत्या प्रकारचे फायदे होऊन त्यांना मदत होईल पुढील प्रमाणे,
महाराष्ट्र राज्यातील बरेच कुटुंब हे शेती वरती अवलंबून असतात परंतु पाण्याअभावी शेती करणे अशक्य होते त्यामुळे त्यांच्याकडे दुसरे उदरनिर्वाचे साधन असते या शेळी पालन योजनेच्या माध्यमातून त्यांना शेळ्या विकत घेऊन शेळी पालनाचा व्यवसाय सुरू करून ते चांगला नफा कमवून त्यांचा आर्थिक अडचणीचा प्रश्न सोडवू शकतात.
Sheli Palan व्यवसाय हा कमी पैस्यामध्ये सुरू करून जास्त नफा नागरिकांना घेता येतो यामध्ये ते शेळीचे दूध व मांस विकून पैसे कमवू शकतात.
राज्य शासनाकडून शेळीपालनासाठी 75% टक्के अनुदान दिले जाते व लाभ घेणाऱ्या नागरिकास फक्त 25% टक्के रक्कम भरून ते शेळ्या घेऊ शकतात तसेच 25% रक्कम नसेल तर ती रक्कम ते बँकेकडून कमी व्याजदरावरती कर्ज घेऊन ते भरू शकतात.
राज्यातील शेतकरी शेळ्यांबरोबरच मेंढ्या ही या योजनेअंतर्गत घेऊ शकतात व मेंढ्यांपासून निघणाऱ्या लोकर, मांस यांच्यापासून चांगल्या प्रकारचा फायदा कमवू शकतात.
राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या भरघोस अशा अनुदानाद्वारे ते त्यांचा स्वतःचा नवीन व्यवसाय करू इच्छित जवान वर्गास या योजनेच्या माध्यमातून नफा होणार आहे. कोणत्या ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा ते या योजनेचा फायदा घेऊन शेळी पालनाचा व्यवसाय उत्तम प्रकारे करू शकतील.
शेळी पालन अनुदान योजनेच्या अंतर्गत ज्या युवकांना शिक्षित असूनही नोकरी मिळत नाही असे युवक या शेळी पालनाकडे एक चांगल्या दर्जाचा व्यवसाय म्हणून ते करू शकतात.
यांसारखे फायदे हे लाभार्थी नागरिकांना या Sheli Palan योजनेच्या माध्यमातून मिळतील.
Sheli Palan Yojana पात्रता व निकष
शेळी पालन योजना:-जे लोक शेळी पालन योजनेसाठी अर्ज भरणार आहेत अशा लोकांनी खालील प्रमाणे सर्व पात्रता निकष पाळणे गरजेचे आहे.
सर्वप्रथम नागरिक महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असणे गरजेचे आहे. नागरिक जर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी नसेल तर त्याला या योजनेचा फायदा घेता येणार नाही.
अर्ज करणाऱ्या अर्जदार नागरिकाचे व शेतकऱ्याचे वय हे अठरा वर्ष व त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
शेळी पालन योजनेचा लाभ घेण्या अगोदर च्या अर्ज करणाऱ्या व्यक्तीला शेळ्या पाळण्याचे त्यांचे संगोपन करण्याचे तसेच त्यांची निगा राखण्याचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.
शेळी पालन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकाचे कुटुंब हे दारिद्र्यरेषे खालील असावे.
नागरिकांकडे कमी शेत जमीन आहे म्हणजेच की एक ते दीड एकर पर्यंत शेतजमीन आहे अशांना या योजनेसाठी सर्वात अगोदर पात्र ठरवले जाईल.
शेळीपालनासाठी जे सुशिक्षित युवक इच्छुक आहेत अशा सर्व युवकांना या योजनेसाठी अर्ज करता येतो.
शेळीपालन योजनेचा लाभ घेण्या साठी त्या नागरिकांनी या योजनेच्या अगोदर कोणत्याही प्रकारच्या शेळीपालन किंवा मेंढीपालन या योजनेचा लाभ घेतलेला नसावा असे असेल तर त्यास योजनेत अर्ज करता येणार नाही.
तर अर्ज करणाऱ्या अर्जदाराने वरील सर्व पात्रता निकष पाळणे व त्याची अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे तरच ते या अनुदान योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
Sheli Palan Yojana साठी लागणारे कागदपत्रे
Sheli Palan Yojana Maharashtra:शेळी पालन योजनेसाठी जे कुटुंब किंवा शेतकरी इच्छुक आहेत व त्यांना अर्ज करायचा आहे अशा सर्व नागरिकांना कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते आपण खालील नागरिकांना कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ती खालील प्रमाणे,
अर्ज करणाऱ्या नागरिकाकडे,
आधार कार्ड
पॅन कार्ड
कुटुंबाचे रेशन कार्ड
राहत असलेला पत्ता व रहिवासी दाखला
ई-मेल आयडी
मोबाईल नंबर
वार्षिक उत्पन्नाचा दाखला
अर्ज करणाऱ्या नागरिकाच्या बँक खात्याची सर्व माहिती
जातीचा दाखला तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र.
नागरिकाकडे शेतजमीन असेल तर शेत जमिनीचा 7/12 व 8 अ चा दाखला.
कुटुंबाचा दारिद्र्य रेषेचा दाखला
वर दिलेली सर्व आवश्यक असणारी कागदपत्रे अर्जदार नागरिकाकडे असणे आवश्यक आहे तरच ते या Sheli Palan योजनेचा व्यवस्थित अर्ज भरू शकतात.
शेळी पालन योजना अर्ज करण्याची पद्धत. Sheli Palan Yojana Maharashtra online application 2024
Sheli Palan Yojana 2024:शेळी पालन योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे ती शेतकरी ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात, तर तो अर्ज कसा करायचा हे सविस्तरपणे जाणून घेऊया,
अर्ज करणाऱ्या नागरिकास दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो परंतु आम्ही तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयास अग्रह करतो कारण ऑफलाइन पद्धतीने अर्ज केल्यास तो अर्ज लवकरात लवकर प्रोसेस होऊन तुम्हाला शेळीपालनासाठी अनुदान लवकरात लवकर मिळेल. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावातील किंवा जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता.ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया किचकट असल्यामुळे तुम्हाला स्वतःला या योजनेचा अर्ज भरताना खूप अडचणी येऊ शकतात.
नागरिकांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरणे गरजेचे आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरताना वरील दिलेल्या कृषी विभागाच्या वेबसाईटवरून शेळी मेंढी पालन योजनेचा अर्ज डाऊनलोड करून घ्यावा. व तो अर्ज व्यवस्थित रित्या भरून त्या सोबत आवश्यक ती वर दिलेली सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज तुमच्या ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये जमा करावा. अर्ज जमा केल्यानंतर तिथून तेथून पुढे तुमच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर तुमचे शेळीपालनाचे अनुदान हे मंजूर होईल. तुम्हाला अर्ज भरताना काही अडचणी आल्यास तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत विचारपूस करून माहिती घेऊ शकता व Sheli Palan योजनेस व्यवस्थित अर्ज करू शकता.
Sheli Palan Yojana निष्कर्ष
शेळी पालन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जाती जमाती तसेच खुल्या प्रवर्गामध्ये 75% पासून ते 50 टक्क्यांपर्यंत शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान दिले जाते या अनुदानाच्या माध्यमातून शेळी पालन व्यवसाय करणाऱ्यांना नागरिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे व त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे या योजनेच्या पाठीमागील उद्देश आहे. या Sheli Palan योजनेसाठी नागरिकांनी अर्ज करून या शेळी पालन योजनेचा लाभ घ्यावा.
FAQ’s
1). शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून किती टक्के अनुदान दिले जाते?
उत्तर- शेळी पालन योजनेसाठी राज्य सरकारकडून अनुसूचित जाती जमातीसाठी 75% टक्के व खुल्या प्रवर्गासाठी 50% टक्के एवढे अनुदान दिले जाते.
2).शेळी पालन योजनेसाठी कोण अर्ज करू शकते?
उत्तर- शेळी पालन योजनेसाठी महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिक अर्ज करू शकतात.
3). कोणाच्या मार्फत शेळी पालन योजना राबवली गेली आहे?
उत्तर- राज्य सरकारच्या कृषी विभागांतर्गत ही शेळी पालन योजना राबवली आहे.
4). शेती बरोबरच शेळी पालनाचा व्यवसाय करू शकतो का?
उत्तर- हो शेतीसोबत शेळी पालनाचा व्यवसाय करता येतो.
5).शेळी पालन योजनेचा अर्ज कुठे करावा?
उत्तर- शेळीपालन योजनेसाठी नागरिकांनी अर्ज हा त्यांच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये अर्ज करावा.
Read more:-https://hellomarathi.org/rojgar-hami-yojna-maharashtra/