Rojgar Sangam Yojna information in Marathi 2024
Rojgar Sangam Yojna Maharashtra 2024: महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार नागरिकांना आर्थिक मदत व्हावी यासाठी रोजगार संगम योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये आर्थिक स्वरूपात दिले जातात.
तसेच यामध्ये लाभार्थी असलेल्या नागरिकांना या योजनेमार्फत कौशल्य प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. जेणेकरून नागरिकांना आपली व्यावहारिक क्षमता आत्मसात करून रोजगार निर्माण करण्यात मदत मिळेल. नागरिकांना हे कौशल्य प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने दिले जाते.
महाराष्ट्रामध्ये सध्या बेरोजगारीचे प्रमाण फार वाढले आहे आणि यामध्ये बरेच तरुण चांगले उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी नसल्याकारणामुळे नोकरीसाठी इथे तिथे भटकत आहेत. यासाठी सरकारने रोजगार संगम योजना महाराष्ट्रात सुरु केली. जेणेकरून कौशल्य प्रशिक्षण घेत दरमहा आर्थिक मदतीमुळे स्वतःचा व्यवसाय आणि कमी स्रोत निर्माण करण्यासाठी मदत होईल.
जे तरुण या योजनेत अर्ज करून लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी हा लेख शेवटपर्यंत पहा. यामध्ये आम्ही योजना संबंधित महत्त्वपूर्ण माहिती, उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज प्रकिया याबद्दल संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे.
Rojgar Sangam Yojna
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोजगार संगम योजना २०२४ मध्ये सुरु केली. या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेणाऱ्या तरुणांना दरमहा 5,000 रुपये वेतन दिले जाते. त्याचसोबत कौशल्य विकासाचे प्रशिक्षणही ऑनलाइन दिले जाते. महाराष्ट्र सरकारचा हेतू राज्यामधील बेरोजगारी दर कमी करणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणे.
जे तरुण शिक्षण घेऊन नोकरी नसल्याकारणामुळे बेरोजगारीच्या जाळ्यात अडकले आहेत, त्यांना ही योजना आर्थिक आणि व्यावहारिक दृष्टया सक्षम बनविण्यास मदत करेल. तसेच राज्यामध्ये बेरोजगारी कमी होऊन रोजगार दर वाढण्यात मदत मिळेल.

Rojgar Sangam Yojna 2024
Rojgar Sangam Yojna थोडक्यात आढावा.
Rojgar Sangam Yojna 2024 Overview.
योजनेचे नाव:-रोजगार संगम योजना महाराष्ट्र
श्रेणी:-महाराष्ट्र सरकारी योजना
कोणी चालू केली:-महाराष्ट्र सरकारने
कधी चालू केली:-2024
विभाग:-Skills, Employment, Entrepreneurship and innovation department
उद्देश:-राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत पुरवणे
लाभार्थी:-महाराष्ट्रातील बेरोजगार वर्ग
लाभ:-लाभार्थीना दरमहा 5000 रुपये वेतन
अर्ज पद्धत:-ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट:-http://-rojgar.mahaswayam.gov.in
Rojgar Sangam Yojna Objective.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या रोजगार संगम योजनाचे उद्देश राज्यामधील बेरोजगार तरुणांना आर्थिक स्वरूपात मदत प्रदान करणे. तसेच राज्यामध्ये नागरिकांना नोकरीसाठी चांगल्या संधी उपलब्ध करून देणे.
जेणेकरून या योजनेच्यामार्फत लाभार्थी रोजगार निर्माण करेल आणि पैसे कमावून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यास सक्षम राहतील. त्याचसोबत जे नागरिक यामध्ये अर्ज करून लाभ घेत आहेत, त्यांना सरकारतर्फे कोणत्याही विभागात नोकरीची संधी असल्यास पहिले प्राधान्य दिले जाईल.
आयुष्मान भारत योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-aayushman-bharat-yojna/
प्रधानमंत्री वय वंदना योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhanmantri-vay-vandana-yojna/
Rojgar Sangam Yojna Benefits.
Rojgar Sangam Yojna फायदे .
सरकारने सुरु केलेल्या रोजगार संगम योजनाचे फायदे महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना होतो.
या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारांना सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाते.
जे नागरिक यामध्ये अर्ज करून लाभ घेतात त्यांना सरकार दरमहा 5000 रुपये आर्थिक स्वरूपात देते.
तसेच लाभार्थींना भविष्यात चांगले रोजगार निर्माण होण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणसुद्धा दिले जाते.
सरकारतर्फे मिळणाऱ्या या प्रशिक्षणातून तरुण अधिक व्यावहारिक दृष्टया अधिक सक्षम होतात.
त्याचप्रमाणे, उच्च कामाच्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतील तर तिथे लाभार्थींना सहभागी केले जाते.
महाराष्ट्र सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक व शैक्षणिक मदतीमुळे भविष्यात बेरोजगारी कमी करण्यात मदत होईल.
महाराष्ट्रामधील बेरोजगार युवक चांगले रोजगार प्राप्त करून स्वतंत्र आणि आत्मनिर्भर राहतील.
या योजनेतून लाभार्थींना येणारी रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे पाठविले जाते.
या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना मिळणाऱ्या रक्कमेतून आपला दैनंदिन खर्च भागवता येतो.
ज्या इच्छुक तरुणांना यामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यायचा असेल त्यांना कुठेही फेऱ्या मारण्याची गरज नाही.
तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन मोबाईलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
लाभार्थींना नोकरी मिळत नाही तोपर्यंत शासनातर्फे लाभ दिला जाणार.
या योजना अंतर्गत स्त्री, पुरुष व ट्रान्सजेंडर यामधील व्यक्ती अर्ज करून लाभ घेऊ शकतो.
Rojgar Sangam Yojna eligibility.
जे नागरिक अर्ज करून लाभ घेण्यास इच्छुक आहेत त्यांना खालील दिलेल्या रोजगार संगम योजनासाठी पात्रता असणे आवश्यक आहे.
या योजनेमध्ये अर्ज करणारे अर्जदार महाराष्ट्र राज्यातील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे.
यामध्ये सहभागी होण्यासाठी तरुणांचे वय 18 ते 40 वर्षा खाली असणे.
जे अर्जदार सुशिक्षित असून बेरोजगार आहेत तेच यामध्ये अर्ज करू शकतात.
ज्या तरुणांचे 12वी, पदवीधर, डिप्लोमा आणि उच्च शिक्षण झाले आहेत फक्त तेच यामध्ये अर्ज करू शकतात.
जे अर्जदार या योजनेसाठी अर्ज करायचा विचार करत आहेत, ते बेरोजगार असणे.
अर्जदाराचे बँक खाते असून ते आधारकार्ड सोबत जोडलेले असणे आवश्यक आहे.
तसेच अर्जासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
रोजगार संगम योजनाचे अटी
यामध्ये अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातील नसावा.
सहभागी होणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही उत्पनाचे साधन नसावे.
शासनाने दिलेल्या वयाच्या मर्यादानुसार अर्जदाराचे वय असावे.
अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखापेक्षा कमी असणे.
अर्जदार तरुण कोणत्याही खाजगी व शासकीय कार्यालयात कार्यरत नसावा.

Rojgar Sangam Yojna 2024
Rojgar Sangam Yojna आवश्यक कागदपत्रे.
Rojgar Sangam Yojna Required Documents .
अर्जदारांना या उपक्रमात नोंदणी करताना खालील दिलेल्या रोजगार संगम योजनाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे आधारकार्ड तेही बँक लिंक असणे.
त्या तरुणाचे शैक्षणिक आणि पदवीचे प्रमाणपत्र (मार्कशीट)
शिधापत्रिका
अधिवास प्रमाणपत्र
वयाचे प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला)
बँक पासबुकचे पहिले पान
ई-मेल आयडी
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
जातीचा दाखला
कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न दाखला
पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-yashasvi-scholarship-yojna/
जननी सुरक्षा योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/janani-suraksha-yojana/
Rojgar Sangam Yojna online apply.
महाराष्ट्र राज्यामधील ज्या बेरोजगार तरुणांना रोजगार संगम योजनामध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून लाभ मिळवायचा आहे, त्यांनी खालील दिलेल्या ऑनलाइन प्रक्रियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करून अर्ज करावा.
पहिली स्टेप: अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला क्रोममध्ये जाऊन रोजगार संगम योजनाची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल. सुरुवातीला तुम्हाला नोंदणी करून रजिस्टर आयडी आणि पासवर्ड तयार करावे लागेल.
दुसरी स्टेप: तुमच्या समोर वेबसाइटचे होमपेज उघडून येईल. यामधील नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
तिसरी स्टेप: त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर रोजगार संगम योजना नोंदणी फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती विचारली असेल, तुमचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्म तारीख, लिंग, आधार आयडी आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. नंतर कॅप्चा कोड टाकून नेक्स्ट वर क्लिक करणे. तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो टाकून कन्फर्मवर क्लिक करणे.
चौथी स्टेप: त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल त्यामध्ये तुमची पुन्हा वैयक्तिक माहिती भरावी लागेल. नंतर खाली तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करावा लागेल, तो पासवर्ड लक्षात राहील असा टाकणे आणि Create Account यावर क्लिक करणे.
पाचवी स्टेप: त्यानंतर तुमच्या ई-मेल आयडीवर आणि मोबाईलमध्ये मेसेजवर आयडी व पासवर्ड पाठविला जाईल. तुम्हाला पुन्हा सेम वेबसाइटवर येऊन ई-मेलवर मिळालेला रजिस्टर आयडी आणि पासवर्ड टाकून पोर्टलमध्ये लॉगिन करून घेणे.
सहावी स्टेप: पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन डॅशबोर्ड उघडून येईल. त्यामध्ये तुम्हाला पाच पर्याय दिसतील, त्यामध्ये वैयक्तिक, शैक्षणिक, अतिरिक्त अभ्यासक्रम, कामाचे अनुभव आणि इतर माहिती या सगळ्या पर्यायांमधील माहिती क्रमाने भरून घ्या. सुरुवातीला सगळी माहिती पाहूनच भरायला घ्या. माहिती संपूर्ण भरून झाल्यावर तुम्हाला शेवटी सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
सातवी स्टेप: फॉर्म आणि कागदपत्रे सबमिट झाल्यानंतर तुमच्या ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरवर पोचपावती येईल किंवा तुमच्या समोर पोचपावती स्क्रीनवर उघडून येईल ती डाउनलोड करून घ्या आणि प्रिंट करून सुरक्षित ठेवा. पुढे जाऊन तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती त्या पोचपावतीनुसार तपासू शकता. अशा प्रकारे तुमचे या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज प्रकिया यशस्वीरीत्या पार पडली आहे.
Rojgar Sangam Yojna Helpline number.
जर तुम्हाला अर्ज करताना काही समस्या आल्यास किंवा आम्ही दिलेल्या रोजगार संगम योजनेची माहिती शिवाय अधिक माहितीसाठी तुम्ही हेल्पलाईन नंबर डायल करून संपर्क करू शकता. रोजगार संगम योजनाचे हेल्पलाईन नंबर 1800-233-2211 किंवा 022-22625651/53 हा आहे.
Rojgar Sangam Yojna निष्कर्ष.
अशा प्रकारे आम्ही तुम्हाला Rojgar Sangam Yojana याबद्दल संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीमध्ये सांगितली. यामध्ये आम्ही तुम्हाला योजना संबंधित महत्त्वाची माहिती, ही योजना काय आहे? ती का सुरु करण्यात आली? कोणी सुरु केली? कोणासाठी सुरु केली? त्यांचे विभाग कोणते? चालू करण्यामागचा उद्देश काय होता? त्यांचे फायदे काय आहेत? यासाठी कोण कोण पात्र आहेत? अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत? यामध्ये अर्ज करून कशाप्रकारे लाभ मिळवू शकतो? काही समस्या आल्यास हेल्पलाईन नंबर अशा सगळ्या माहितीबद्दल आम्ही मार्गदर्शन केले.
तुम्ही सुद्धा शिक्षण करून नोकरीसाठी भटकत असाल आणि आर्थिक समस्यांमध्ये झुंजत असाल तर या योजनेमध्ये आम्ही सांगितल्या माहितीप्रमाणे अर्ज करून लाभ मिळवा. आमचा हा लेख तुम्हाला उपयुक आणि मदतगार वाटला असेल तर तुमच्या ओळखीमधील बेरोजगार गरजू लोकांना हा लेख पाठवा.
अशाच नवीन आणि फायदेशीर योजनांसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करून ठेवू शकता आणि आमच्या WhatsApp/Telegram चॅनलला जॉईन करून नवनवीन अपडेट्स प्राप्त करू शकता.
FAQs.
रोजगार संगम योजना महाराष्ट्रात उपलब्ध आहे का?
होय, ही योजना महाराष्ट्रात उपलब्ध करण्यात आलेली आहे.
संगम योजनेचा उद्देश काय आहे?
या योजनेचा उद्देश राज्यामधील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करणे आणि त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार निर्माण करण्यासाठी सक्षम बनविणे.
रोजगार संगम योजनासाठी कोण पात्र आहेत?
या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील शैक्षणिक अनुभव आणि पदवीधर तरुण यामध्ये पात्र आहेत.