PM Yashasvi Scholarship Yojna 2024, पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना 2024.

PM Yashasvi Scholarship Yojna information in Marathi.

PM Yashasvi Scholarship Yojna 2024: विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना केंद्रातील सरकारने सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशामधील गरीब व दुर्बळ वर्गातील मुलींना आणि मुलांना उच्च शिक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून ही योजना मदत करते. भारत देशामधील जे कुटुंब आर्थिक स्वरूपात कमकुवत आहेत, त्या कुटुंबातील मुले व मुलींना प्रधानमंत्री यशस्वी योजना अंतर्गत लाभ दिला जातो. 

PM Yashasvi Scholarship चे संचालन NTA म्हणजेच National Testing Agency द्वारे केले जाते. भारत सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारी मंत्रालयाकडून जे विद्यार्थी मागासवर्गीय, अनुसूचित जाती व जमातीमधील तसेच भटक्या जमाती या वर्गातील आहेत, त्यांना उच्च शिक्षणाची प्राप्ती व्हावी यासाठी प्रत्येक वर्षी प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप उपलब्ध करून दिली जाते. 

तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो की, प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना अंतर्गत अर्ज करून लाभ घेण्यास सुरुवात झालेली असून शेवटची तारीख 31ऑक्टोबर, 2024 ठेवण्यात आलेली आहे. जर तुम्ही सुद्धा या योजनेमध्ये अर्ज करून लाभ घेण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. आम्ही आमच्या या लेखात योजनेमध्ये अर्ज करायच्या प्रकियाबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे. तसेच यामध्ये आम्ही त्यांचे उद्देश, फायदे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे व रजिस्ट्रेशन याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे ती शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा.

PM Yashasvi Scholarship Yojna

PM Yashasvi Scholarship Yojana in Marathi 

केंद्र सरकारने सुरु केलेल्या यशस्वी योजनेची सुरुवात PM YASASVI Scheme या नावाने 26 जानेवारी, 2024 रोजी प्रकाशित करण्यात आली होती. PM YASASVI याचा पूर्ण अर्थ म्हणजेच PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India असा आहे आणि ही scheme Ministry of Social Justice and Empowerment या डिपार्टमेंटद्वारे चालविण्यात येते.

भारत देशामधील गरीब व आर्थिक स्वरूपात कमकुवत असलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री यशस्वी योजना या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या योजना अंतर्गत इयत्ता नववी ते बारावी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेच्या माध्यमातून 75,000 रुपये ते 1,25,000 रुपये पर्यंतची स्कॉलरशिप दिले जाते. 

9वी ते 12वी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेरिट लिस्टच्या आधारे या योजनेचा लाभ दिला जातो. देशभरातील OBC, DNT, SNT, EBC आणि NT वर्गांमधील विद्यार्थांना या योजनेच्यामार्फत आर्थिक मदत व विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीचे लाभ उपलब्ध करून दिले जातात. देशामधील विद्यार्थ्यांना अर्ज करून लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहेत. 

PM Yashasvi Scholarship Yojna in short

योजनाचे नाव:-प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना 2024

श्रेणी:-केंद्र सरकारी योजना

सुरु करण्याची तारीख:-26 जानेवारी, 2024 रोजी

कोणी सुरु केली:-केंद्र सरकारने

विभाग:-Ministry of Social Justice and Empowermentप्राधिकरणNational Testing Agency

उद्देश:-भारतामधील गरीब व दुर्बळ वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे

लाभार्थी:-देशामधील 9वी ते 12वी वर्गामधील विद्यार्थीलाभ75,000 रुपये ते 1,25,000 रुपये पर्यंतची स्कॉलरशिप

अर्ज पद्धत:-ऑनलाइन

अधिकृत वेबसाइट:-http://yet.ntc.ac.in

PM Yashasvi Scholarship Yojna Aim.( ध्येय)

केंद्र सरकारद्वारे सुरु केलेल्या प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनाचे मुख्य उद्देश देशातील दुर्बळ आणि आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या कुटुंबातील मुला-मुलींना उच्च शिक्षण प्राप्त करण्यास शिष्यवृत्ती मिळवून देणे. जेणेकरून गरीब वर्गातील विद्यार्थी चांगले शिक्षण प्राप्त करून आपले व कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करण्यात त्यांना मदत होईल. 

या योजनेच्या माध्यमातून गरीब वर्गास आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल आणि देशाची सुद्धा इकॉनॉमिकली, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल. देशामधील OBC, CS, CSS, DNT, SNT व EBC अशा वर्गांना आर्थिक व सामाजिक दृष्टया सुरक्षित ठेवण्याचे ध्येय केंद्र शासनाचे आहे.

जननी सुरक्षा योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/janani-suraksha-yojana/

आयुष्मान भारत योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pm-aayushman-bharat-yojna/

PM Yashasvi Scholarship Yojna फायदे.

PM Yashasvi Scholarship Yojna Benefits

देशामधील गरीब वर्गातील विद्यार्थी आपल्या उच्च शिक्षणासाठी प्रधानमंत्री यशस्वी योजनाचा फायदा घेऊ शकतात. 

केंद्र सरकारतर्फे गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी स्कॉलरशिपच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. 

9वी पासून ते 10वी वर्गामधील विद्यार्थी मुला-मुलींना या योजनेच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी आर्थिक स्वरूपात 75,000 रुपयांचा लाभ दिला जातो. 

तसेच या योजने अंतर्गत 11वी ते 12वी वर्गामधील शिकत असलेल्या विद्यार्थी मुला-मुलींना शिक्षण प्राप्त करण्यासाठी 1,25,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. 

या योजनेच्या माध्यमातून भारत देशामधील OBC, CS, CSS, DNT, SNT व EBC या श्रेणीमधील विद्यार्थ्यांना सहभागी होऊन लाभ घेता येणार.

PM Yashasvi Scholarship Yojna 2024

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना पात्रता.

PM Yashasvi Scholarship Yojana Eligibility 

विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेच्या अंतर्गत पात्र ठरण्यासाठी खालील दिलेल्या अटीनुसार पात्रता असणे आवश्यक आहे, तेव्हाच विद्यार्थी अर्ज करून लाभ मिळविण्यासाठी सक्षम राहील. 

या योजने अंतर्गत अर्ज करून लाभ घेण्यासाठी विद्यार्थी भारत देशाचा मूळचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. 

अर्ज करणाऱ्या विद्यार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या पेक्षा जास्त नसले पाहिजे. 

देशामधील OBC, CS, CSS, DNT, SNT व EBC यांसारख्या गरीब व दुर्बळ वर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार. 

9वी आणि 11वी वर्गातील उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या योजनेमध्ये अर्ज करून स्कॉलरशिपचा लाभ मिळवू शकतात. 

या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थीच्या कुटुंबामधील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयात कार्यरत नसले पाहिजे.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhanmantri-vay-vandana-yojna/

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhanmantri-vidya-lakshmi-yojna/

PM Yashasvi Scholarship Yojna document Required.

विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनामध्ये आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहेत ते खालील प्रमाणे सांगण्यात आलेले आहेत. 

अर्जदार विद्यार्थ्याचे आधारकार्ड (बँक लिंक असणे) 

वयाचे प्रमाणपत्र (शाळेचा दाखला देऊ शकता) 

रहिवासी प्रमाणपत्र 

शैक्षणिक पुरावा (9वी किंवा 11वीचे मार्कशीट) 

जातीचा दाखला 

मोबाईल नंबर 

पासपोर्ट आकाराचा फोटो 

बँक पासबुकचे पहिले पान 

कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला

PM Yashasvi Scholarship Yojana Registration 

जे विद्यार्थी प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनामध्ये रजिस्ट्रेशन करून लाभ घेण्यास इच्छुक आहेत, त्यांनी खालील दिलेल्या अर्ज प्रकियांना स्टेप बाय स्टेप फॉलो करून रजिस्टर करू शकतात. 

अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला केंद्र सरकारतर्फे चालू केलेल्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलची अधिकृत वेबसाइट उघडायची आहे. 

तुमच्या समोर वेबसाइटचे होमपेज उघडून येईल. 

त्या होमपेजमधील वरच्या बाजूला Student असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करणे. 

त्या नवीन पेजमध्ये असणाऱ्या पर्यायांमधील Apply for Scholarship यावर क्लिक करायचे आहे. 

त्यामध्ये तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड लागेल ते तयार करावे लागेल. 

लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करण्यासाठी तुम्हाला new user हा पर्याय दिसेल, त्यामध्ये जाऊन continue वर क्लिक करणे. 

त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल, त्यामध्ये तुम्हाला चार प्रकिया कराव्या लागतील. 

त्या चार प्रकियामध्ये तुम्हाला गाईडलाईन्स, मोबाईल नंबर रजिस्टर, eKYC व फिनिश पार पाडावे लागेल. 

ही प्रकिया झाल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल. 

पुन्हा मागे येऊन रजिस्टर केलेला लॉगिन आयडी व पासवर्ड त्यामध्ये टाकून घेणे. 

त्यानंतर कॅप्चा कोड टाकून लॉगिन बटनावर क्लिक करणे. 

पोर्टल लॉगिन करून झाल्यावर तुमच्या समोर अर्ज करण्यासाठी फॉर्म उघडून येईल. 

तो फॉर्म पूर्णपणे काळजीपूर्वक भरून घेणे

फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक असणारे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून घेणे. 

या दोन्ही प्रकिया पूर्ण झाल्यावर तपासणी करून सबमिट बटनावर क्लिक करणे. 

अशाप्रकारे या योजनामध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकता.

PM Yashasvi Scholarship Yojna Selection Process 

विद्यार्थ्यांची अर्ज प्रकिया पूर्ण झाल्यानंतर PM Yashasvi Entrance Test Scheme 2024 च्या माध्यमातून प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिपसाठी निवड खालील प्रकियानूसार करण्यात येते.   

सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले एप्लिकेशन्स फॉर्म स्वीकारले जातात. 

अर्ज स्वीकारून झाल्यानंतर जिल्हा स्थरावर अर्जाचे फॉर्म तपासले जातात आणि पडताळणी केली जाते. 

पडताळणी झाल्यानंतर मेरिटच्या आधारावर प्राधान्य देऊन पात्र असलेले विद्यार्थ्यांचे अर्ज निवडले जातात. 

त्यानंतर सगळ्या निवडलेल्या अर्जदारांना Public Financial Management System (PFMS) च्या माध्यमातून लाभार्थी नोंदीमध्ये जोडले जाते. 

नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मेरीटनुसार लाभार्थींची यादी प्रकशित केली जाते. 

प्रकशित केल्यानंतर लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेची रक्कम डीबीटी द्वारे पाठविली जाते.

PM Yashasvi Scholarship Yojna निष्कर्ष.

अशा प्रकारे आम्ही तुम्हाला PM Yashasvi Scholarship Yojna 2024 संदर्भात संपूर्ण माहिती सोप्या पद्धतीने सांगितली. त्याशिवाय आम्ही तुम्हाला यामध्ये योजनाचे महत्व काय आहेत? ती का सुरु केली? कोणासाठी सुरु करण्यात आली? कोणाच्या माध्यमातून करण्यात आली? त्यामागचे उद्देश काय होते? यामध्ये लाभार्थी कोण असणार आहेत? अर्ज करण्यासाठी अर्ज पद्धती कोणत्या आहेत? ऑफिशिअल वेबसाइट कोणती आहे? त्यांचे फायदे कोणते? यासाठी कोण पात्र असणार आहेत? यामध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार? ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रकिया कोणत्या? आणि कशाप्रकारे लाभार्थींची निवड केली जाते अशा सगळ्या गोष्टीबद्दल मार्गदर्शन केले. 

तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि तुम्हाला सुद्धा या योजनेमार्फत अर्ज करून लाभ घ्यायचा असेल, तर आम्ही दिलेल्या लेखातून संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि अर्ज करून शिष्यवृत्तीचा फायदा घ्या. आमचा हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्र- मैत्रिणींना सुद्धा पाठवून त्यांना या योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहन करा. 

केंद्र आणि राज्य स्थरावर सुरु होणारे नवनवीन योजनांच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला Subscribe करा आणि आमच्या Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करा. जेणे करून नवीन अपडेट्स तुम्हाला त्वरित भेटून फायदा घेता येईल.

PM Yashasvi Scholarship Yojna वारंवार विचारले जाणारे प्रश्न

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती 2024 साठी अर्ज कसे करायचे? 

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती 2024 साठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलच्या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. 

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजनसाठी कोण पात्र आहेत? 

भारत देशामधील 9वी व 11वी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. 

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचे लास्ट डेट काय आहे? 

या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी लास्ट डेट 31 ऑक्टोबर, 2024 असणार आहे.