PM Ayushman Bharat Yojna information in Marathi.
PM Ayushman Bharat Yojna 2024: केंद्र सरकारने सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना ५ लाखांपर्यंतचा वैद्यकीय विमा मोफत दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून देशामधील गरीब व दुर्बल वर्गातील नागरिकांना आपले वैद्यकीय उपचार मोफत करता येणार.
आज आपल्या लेखातून अशा एका आरोग्य विमा योजना संदर्भात जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये देशामधील जवळपास 12 कोटी गरीब कुटुंबियांना याचा फायदा झाला आहे.
या योजनेचे नाव आहे PM Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojna म्हणजेच PMJAY. या योजना अंतर्गत PM Ayushman Bharat Card धारकांना केंद्र सरकार 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देण्यासाठी मदत करते.
या योजनेचा प्रमुख उद्देश लोकांचा मेडिकल खर्च कमी करणे आहे. कारण आरोग्याच्या काळजीसाठी केलेल्या खर्चामुळे दरवषी 6 कोटी लोक गरिबीच्या जाळ्यात फसतात. आयुष्मान कार्ड हे beneficiary card आहे, ज्यामधून लोक या योजनाचा लाभ घेऊ शकतात.

PM Ayushman Bharat Yojna
PM Ayushman Bharat Yojna in Marathi
आयुष्मान भारत योजना म्हणजेच PMJAY या योजनाची सुरुवात 23 सप्टेंबर, 2018 रोजी करण्यात आली होती आणि ही एक आरोग्य विमा सेवा आहे, जी केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आली होती. ही योजना देशामधील सगळ्यात मोठी आरोग्य सेवा योजना आहे.
यामध्ये प्रत्येक कुटुंबामधील लाभार्थींना एका वर्षासाठी 5 लाखांपर्यंतचा विमा कव्हर दिला जातो. ज्यामध्ये secondary care आणि tertiary type hospitalization चा coverage दिला जातो. या योजनाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्र उचलतो आणि यासाठी लाभार्थीना एक ही रुपये प्रीमियन द्यावा लागत नाही.
PM Ayushman Bharat Yojna थोडक्यात आढावा.
PM Ayushman Bharat Yojna in short.
योजनाचे नाव:-आयुष्मान भारत प्रधानमंत्री जण आरोग्य योजना
श्रेणी:-केंद्र सरकारी योजना
सुरु कोणी केली:-केंद्र सरकारने
कधी सुरु केली:-23 सप्टेंबर, 2018 रोजी
विभाग:-आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
उद्देश:-गरीब व दुर्बळ वर्गातील लोकांना वैद्यकीय सुरक्षा देणे
लाभार्थी:-भारतातील नागरिक
लाभ:-मोफत 5 लाखांचा वैद्यकीय विमा
अर्ज पद्धत:-ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट:-http://abdm.gov.in
PM Ayushman Bharat Yojna ध्येय.
Ayushman Bharat Yojna Aim
केंद्र सरकारने सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनाचे उद्देश देशामधील गरिबीत राहत असलेल्या नागरिकांना चांगल्या आरोग्यासाठी वैद्यकीय सुरक्षा प्रदान करणे. जेणेकरून मोठमोठ्या आजारासाठी चांगले उपचार घेता येतील आणि आर्थिक खर्चासाठी चिंता करता येणार नाही. ही योजना केंद्र सरकारने देशामधील गरजू लोकांसाठी सुरु केली आहे.
देशभरातील गरीब वर्गातील परिवार मोठमोठ्या हॉस्पिटलसाठी खर्च करू शकत नाही, त्यात सरकारी हॉस्पिटलमध्ये योग्यरीत्या फॅसिलिटी व उपचार घेता येत नाही. या योजनेमधून होणाऱ्या मदतीमुळे लाभार्थी चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो.
PM Ayushman Bharat Yojna Key Features and Benefits.
कॅशलेस उपचार सुविधा
आयुष्मान भारत योजना अंतर्गत लाभार्थी खाजगी, सरकारी आणि empanelled हॉस्पिटल्समध्ये फ्रीमध्ये उपचार घेऊ शकतात. empanelled हॉस्पिटल्स म्हणजेच prescribed standards फॉलो करणारे व विमा कंपनीसोबत जुडलेले असणे. केंद्र सरकारतर्फे मिळालेल्या योजनेमधून लाभार्थींना पहिले पेमेंट भरून परतफेड करायची आवश्यकता लागत नाही. ज्यामुळे लाभार्थींच्या खिश्यावर आर्थिक परिणाम होत नाही. हॉस्पिटलमध्ये तुम्हाला फक्त ABHA card दाखवायचे आहे आणि कॅशलेस उपचार दिले जातील.
कोणतेही बंधन नाही
या योजनामध्ये कुटुंबातील कितीही सदस्य यामध्ये सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात आणि कुटुंबातील कितीही वयाचे सदस्य व स्त्री-पुरुष सदस्य यामध्ये सहभागी होऊ शकतात.
खर्च कव्हर केले जाते
या योजना अंतर्गत कमीत कमी 1929 वैद्यकीय प्रक्रियांचा समावेश आहे. तसेच यामध्ये खूप सारे खर्चसुद्धा कव्हर केले जाते. ज्यामध्ये मेडिकल परीक्षा, उपचार, Consultation, Surgeon शुल्क, औषधे, नॉन-इंटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह काळजी, Diagnostic, Laboratory Investigation, राहण्याच्या सोयीसोबत OT व ICU Charges. तसेच अन्न सेवा आणि उपचारा दरम्यान इतर कोणत्याही समस्या झाल्या तर त्यांचाही खर्च भागवला जातो.
हॉस्पिटॅलिझशन कव्हरेज
हॉस्पिटॅलिझशन कव्हरेजमध्ये लाभार्थीना हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वीच्या तीन दिवसाचा खर्च आणि डिस्चार्ज नंतरच्या 15 दिवसांचा खर्च दिला जातो, ज्यामध्ये औषधांचा खर्च व Diagnostic चा कव्हर दिला जातो.
कुटुंबासाठी कव्हरेजचा वापर
कुटुंबातील कोणासाठीही सदस्याच्या वैद्यकीय उपचारासाठी 5 लाख कव्हरचा वापर करू शकतो किंवा कुटुंबातील सगळे सदस्य या कव्हरेजचा फायदा कधीही घेऊ शकतात.
आधीच्या असलेल्या रोगांचा उपचार
जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला आधीपासून काही आजार असतील, तर आयुष्यमान कार्डच्या मदतीने पहिल्या दिवसापासून उपचार चालू करू शकतो. सामान्यतः जर जुना रोग असेल तर ते सुद्धा पहिल्या दिवसापासून नीट करण्यात लक्ष दिले जाते.
PM Ayushman Bharat Yojna Eligibility.
Ayushman Bharat Yojna पात्रता.
आयुष्मान भारत योजनामध्ये आर्थिक दृष्टया गरीब व दुर्बळ वर्गातील लोक सहभागी होऊ शकतात.
यामध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार भारतातील रहिवासी असणे.
गरीब वर्गातील लोक ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही आहेत.
जे कुटुंब Socio-Economic Caste Census 2011 यामध्ये रजिस्टर आहेत ते सहभागी होऊ शकतात.
जे नागरिक राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना अंतर्गत लाभार्थी आहेत.
यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील नागरिक सहभागी होऊ शकतात.
ग्रामीण भागातील अर्जदारांची क्रायटेरिया ज्यांच्याकडे कच्चे घर, घरातील 16 – 59 वयोगटातील सदस्य कमवता नसलेला, स्त्रिया घर सांभाळतात, अपंग/काम करण्यास सक्षम नाही, SC/ST, ज्यांच्याकडे घर नाही व ते अंगमेहनतीचे काम करतात हे लोक लाभ घेऊ शकतात. यामध्ये आदिवासी लोक अर्ज करू शकतात. तसेच ट्रस्टच्या घरात राहणारे लोक व कामगार यामध्ये अर्ज करू शकतात.
शहरी भागातील अर्जदारांसाठी क्रायटेरिया रॅगपिकर, भिकारी, बांधकाम कामगार, प्लम्बर, पेंटर, मजदूर, वेल्डर्स, सुरक्षा रक्षक, कूली, घरगुती कामगार, डोक्यावर सामान घेणारे, कारागीर, हस्तकला कामगार, टेलर्स, वाहतूक कामगार, वाहनचालक, कंडक्टर, वाहन चालकाचा हेल्पर आणि बरेच जण यामध्ये सहभागी होऊ शकतात.
ज्यांना 10 हजारपेक्षा जास्त पगार आहे ते अर्ज करू शकत नाही.
जे नागरिक सरकारी कार्यालयामध्ये व बिगर शेती एन्टरप्राइसेसमध्ये कार्यरत आहेत ते सुद्धा सहभागी होऊ शकत नाही.
ज्यांच्याकडे दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहन असेल तेही यामध्ये अर्ज करू शकत नाही.
ज्यांच्याकडे चांगले पक्के घर आहे ते पात्र नाही.
ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकर जमीन आहे ते सुद्धा पात्र नाही ठरत.
अर्जदाराचे आधारकार्ड मोबाईल नंबर व बॅंके सोबत लिंक असणे आवश्यक आहे.

Ayushman Bharat Yojna
PM Ayushman Bharat Yojna Required Documents.
Ayushman Bharat Yojna आवश्यक कागदपत्रे.
आयुष्मान भारत योजनाचे आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे दिलेले आहेत ते अर्ज करण्याच्या वेळेस लागतील त्याप्रमाणे जमा करून ठेवा.
आधारकार्ड
पॅनकार्ड
रेशनकार्ड
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
जातीचा दाखला
वार्षिक उत्पन्न दाखला
कुटुंबाचे संयुक्त करार प्रमाणपत्र
पासपोर्ट साइज फोटो
PM Ayushman Bharat Yojna अर्ज प्रक्रिया.
Ayushman Bharat Yojana Online Apply
जर तुम्हाला आयुष्मान भारत योजनामध्ये रजिस्ट्रेशन करून लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे Ayushman Card असणे आवश्यक आहे, त्या कार्डच्या साहाय्याने तुम्ही हॉस्पिटलमध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकता. कार्ड काढण्यासाठी खालील दिलेले प्रकिया फॉलो करा.
अर्जदारांनी Ayushman Card Online Apply करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट उघडा.
त्यानंतर होमपेजवरील beneficiary Login च्या बटनावर क्लिक करा.
तुमच्या समोर नवीन पेज उघडून येईल त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका.
त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल तो टाकून घ्या.
ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला EKYC चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
तुमचे ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
त्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर जा त्यामध्ये तुमचे अर्जदार सदस्याच्या नावाला सिलेक्ट करणे.
तुम्हाला पुन्हा EKYC चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर लाइव्ह फोटोसाठी कॉम्प्युटर फोटोवर क्लिक करून तुमचे सेल्फी फोटो अपलोड करणे.
अपलोडींग झाल्यानंतर additional पर्यायावर क्लिक करणे.
तुमच्या समोर फॉर्म उघडून येईल त्यामध्ये विचारली गेलेली माहिती लक्षपूर्वक भरून घेणे.
फॉर्म भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करणे.
अशा प्रकारे तुमचा योजना संबंधित कार्डसाठी अर्ज पूर्ण झालेला आहे आणि आयुष्मान कार्ड तुम्हाला 24 तासांमध्ये प्राप्त होऊन जाईल.
प्रधानमंत्री वय वंदना योजनेच्या महीतीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhanmantri-vay-vandana-yojna/
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/pradhanmantri-krushi-sinchan-yojna/
Download PM Ayushman Bharat Card Using App
सर्वात प्रथम तुम्हाला गूगल प्ले स्टोरमध्ये जाऊन Ayushman App ला डाउनलोड करायचे आहे.
ध्यानात ठेवणे National Health Authority द्वारे दिलेल्या app च डाउनलोड करणे.
त्यानंतर तुम्हाला NHA Data ला accept करावे लागेल.
नंतर तुमची मराठी किंवा तुमची रिजनल भाषा निवडून घेणे.
यानंतर तुम्हाला लॉगिनवर क्लिक करायचे आहे.
त्यामध्ये Beneficiary पर्यायाला निवडायचे.
नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून verify वर क्लिक करा.
verification झाल्यावर मोबाईलवर ओटीपी येईल तो आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करणे.
नंतर तुम्हाला scheme मध्ये PMJAY निवडायचे आहे.
नंतर स्टेट आणि sub-scheme निवडणे.
त्यानंतर search by मध्ये तुम्ही फॅमिली आयडी, आधार नंबर, नाव, PMJAY यांमधील कोणते एक निवडा.
निवडून झाल्यावर जिल्हा सिलेक्ट करा.
शेवटी search बटणवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पूर्ण कुटुंबाची यादी दिसेल.
नंतर तुमचे eKYC झाले नसेल, तर तिथे इकेवायसी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करणे.
त्यामध्ये गेल्यावर तुमचे आधार नंबर टाकून Beneficiary photograph मध्ये तुमचे फोटो काढून अपलोड करा.
जर तुमचे score 80% च्या वर असेल तर ऑटोमॅटिकली eKYC मान्य केली जाईल.
जर तुमची 80% च्या खाली असेल तर eKYC एप्लिकेशन स्टेट हेल्थ ऑथॉरिटीला पाठविण्यात येईल.
नंतर खाली विचारलेले additional माहिती भरून घेणे.
eKYC पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 15 ते 20 मिनिटांच्या आत तुम्ही आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.
कार्ड आल्यानंतर तुम्हाला डाउनलोडच्या पर्यायावर क्लिक करून तुमचे आधारकार्ड नंबर टाकून घेणे.
त्यानंतर तुम्हाला ओटीपी आला असेल तो टाकून कार्ड डाउनलोड करून घेणे.
निष्कर्ष
आम्ही या लेखातून तुम्हाला PM Ayushman Bharat Yojna संबंधित संपूर्ण माहिती सांगितली. यामध्ये आम्ही ही योजना का काढण्यात आली? याचे फायदे काय आहेत? याचा फायदा कोणाला घेता येणार? कोणी सुरु केली? या उपक्रमाची सुरुवात कधी झाली? याचे कामकाज कोणते मंत्रालय पाहत आहेत? तसेच यासाठी कोण पात्र आहेत? यासाठी कोणती वेबसाइट आहे? त्यांचे उद्देश काय आहेत? अर्ज करताना लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत? ऑनलाइन अर्ज कसे करू शकतो? याबद्दल सविस्तर माहिती सोप्या पद्धतीमध्ये सांगितली आहे.
या योजनामध्ये जरी तुम्ही पात्र नसाल परंतु, तुमच्या आसपास कोणी गरजू व्यक्ती असेल त्यांना याबद्दल माहिती पाठवून सहभागी होण्यास मदत करा आणि त्यांच्या आरोग्यासाठी होणाऱ्या खर्चाला वाचावा.
अशाच माहितीपूर्ण योजनांच्या कन्टेन्टसाठी आम्हाला Subscribe करा किंवा आमच्या Telegram/WhatsApp चॅनेलला जॉईन करून नवनवीन अपडेट्स मिळवू शकता.
FAQs
आयुष्मान भारत योजना पात्रता काय आहे?
यासाठी भारतातील गरीब व दुर्बळ वर्गातील नागरिक पात्र आहेत.
आयुष्यमान कार्ड कसे बनवायचे?
Ayushman App मध्ये जाऊन सगळी माहिती भरून कार्ड बनवायचे.
आयुष्मान कार्डचे काय फायदे आहेत?
या कार्डद्वारे तुम्हाला 5 लाखांपर्यंतचा वैद्यकीय विमा मोफत वापरता येणार.
जननी सुरक्षा योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/janani-suraksha-yojana/