Kishori Shakti Yojna information in Marathi 2024.
Kishori Shakti Yojna Maharashtra 2024: नमस्कार वाचकहो, आजच्या लेखात आपण महाराष्ट्र शासनाच्या किशोरी शक्ती योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. किशोरी शक्ती योजनेची सुरुवात 15 मे 2004 रोजी एकात्मिक बालविकास व बालिका मंडळ विभाग यांच्यामार्फत करण्यात आली. महाराष्ट्र शासन मुलींसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण देशातील मुलींचे भविष्य उज्वल होण्यासाठीची महाराष्ट्र सरकारने सुरुवात केलेल्या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे Kishori Shakti Yojna किशोरी शक्ती योजना. देशातील मुलींचे भविष्य उज्वल कसे करता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने किशोरी शक्ती योजनेची सुरुवात केली. राज्यातील मुलींचे आरोग्य कसे योग्य राहील याचा विचार करून ही योजना सुरू करण्यात आली. किशोरवयीन मुलींना IFA टॅबलेट व Deworming टॅबलेट प्रदान केल्या आहेत. ह्या टॅबलेट किशोरवयीन मुलींना देण्यात याव्यात, या टॅबलेट मुलींना 6 महिन्यातून एकदा देण्यात याव्यात असा महाराष्ट्र शासनाने GR काढला आहे. तसेच किशोरी शक्ती योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांकडून किशोरवयीन मुलींना पौष्टिक अन्न देण्यात येते. त्यामध्ये कडधान्य, भात, डाळी, सुकडी या घटकांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनामार्फत या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. किशोरी शक्ती योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्यरेषेखालील व तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील किशोरवयीन मुलींना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येते. Kishori Shakti Yojna या योजनेचा लाभ घेताना आदिवासी मुली व दारिद्र रेषेखालील किशोरवयीन मुली भरपूर प्रमाणात आढळून येतात. या योजनेअंतर्गत मुलींना आर्थिक मदत व पौष्टिक अन्न पुरवले जाते. किशोरवयीन मुलींना सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत किशोरी शक्ती योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींना स्वतः मुलींनी स्वतःची काळजी कशी घ्यायची त्यांना स्वतःच्या पायावर कसे उभा करायचे त्यांच्यातील होणाऱ्या शारीरिक बदलांना कसे सामोरे जायचे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण या योजनेअंतर्गत दिले जाते. किशोरी शक्ती योजनेअंतर्गत 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षण मुलींना ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातून दिले जाते.
आजच्या लेखात आपण किशोरी शक्ती योजना म्हणजे काय?, किशोरी शक्ती योजनेची वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, पात्रता, फायदे, लाभ काय आहेत, किशोरी शक्ती योजनेचा अर्ज कसा करावा?, याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
What Is Kishori Shakti Yojna?
Maharashtra Kishori Shakti Yojna महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील किशोरवयीन मुलींना त्यांच्या स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना होत आहे. या योजनेचा लाभ हा किशोरवयीन मुलींनी शाळा किंवा महाविद्यालय सोडले आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींना त्यांची स्वतःची काळजी कशी घ्यावी, त्यांच्यातील होणाऱ्या शारीरिक बदलांना कसे सामोरे जावे, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पायावर कसे उभा रहावे या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. किशोरवयीन मुलींचा शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. किशोरी शक्ती योजना ही केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेअंतर्गत राबविण्यात येते या योजनेअंतर्गत 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुधारणे, त्यांना पौष्टिक अन्न मिळणे, यांना घरगुती आणि व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करणे, आरोग्य, पोषण, कौटुंबिक कल्याण, बालसंगोपन, वैयक्तिक स्वच्छता, गृह व्यवस्थापन यावर प्रशिक्षण दिले जाते. किशोरवयीन मुलींना त्यांचे शिक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे. हे प्रशिक्षण ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातून किशोरवयीन मुलींना देण्यात येणार आहे. सरकार मार्फत या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलीवर दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. ही योजना महिला व बालविकास विभागामार्फत केली जाणार आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असलेल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही हालाखीची असते अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाला त्यांच्या मुलींचे योग्य ते शिक्षण मिळत नाही आणि ते न मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचे शिक्षण, आरोग्य, स्वच्छता तसेच त्यांचे कला कौशल्य यांच्याकडे त्यांना लक्ष देता येत नाही. या सर्व गोष्टींचे ज्ञान मुलीला मिळावे यासाठी राज्य सरकारने बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्रात किशोरी शक्ती योजना सुरू केली आहे.
Kishori Shakti Yojna:-http://Women and Child Development Department, Haryana https://wcdhry.gov.in › kishori-shak… किशोरी शक्ति योजना | महिला एवं बाल विकास विभाग,
Maharashtra Kishori Shakti Yojna मुलीचे किशोरवयीन वय हे तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे असते. या वयात मुलीला तारुण्याच्या उंबरठ्यावर असल्याने तिच्यात मानसिक, शारीरिक तसेच भावनिक बदल होत असतात हे बदल कसे होतात. तसेच मुलींना त्यांच्या विकासासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे. या उद्देशाने किशोर शक्ती योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना ग्रामीण तसेच शहरी भागातील अंगणवाडी केंद्र मार्फत राबविण्यात येते. किशोरी शक्ती योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखाली मुलींची निवड करून त्यांना 6 महिन्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
Kishori Shakti Yojna.
Kishori Shakti Yojna ठळक मुद्दे :
किशोरी शक्ती योजना म्हणजे काय
What Is Kishori Shakti Yojna
किशोरी शक्ती योजनेची थोडक्यात माहिती
Kishori Shakti Yojna In Short
किशोरी शक्ती योजनेची उद्दिष्ट
Kishori Shakti Yojna Purpose
किशोरी शक्ती योजनेचे लाभ
Kishori Shakti Yojna Benefits
किशोर किशोरी शक्ती योजनेची वैशिष्ट्ये
Kishori Shakti Yojna Features
किशोरी शक्ती योजनेचे फायदे
Kishori Shakti Yojna Maharashtra Benefits
किशोरी शक्ती योजनेची निवड प्रक्रिया
Kishori Shakti Yojna Maharashtra
किशोरी शक्ती योजनेचे लाभार्थी
Maharashtra Kishori Shakti Yojna Eligibility
किशोरी शक्ती योजनेअंतर्गत दिले जाणारे प्रशिक्षण
Maharashtra Kishori Shakti Yojna
किशोरी शक्ती योजनेच्या अटी
Kishori Shakti Yojna Conditions
किशोरी शक्ती योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Kishori Shakti Yojna Documents
किशोरी शक्ती योजनेची अर्ज प्रक्रिया
Kishori Shakti Yojna Application Form
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Kishori Shakti Yojna In Short.
योजनेचे नाव:-किशोरी शक्ती योजना
कोणी सुरू केली:+महाराष्ट्र सरकार
कधी सुरू केली:-15 मे 2004
लाभार्थी:-महाराष्ट्रातील किशोरवयीन मुली
विभाग:-महिला व बाल विकास मंत्रालय
उद्देश:-किशोरवयीन मुलींना सक्षम बनविणे
अर्ज प्रक्रिया:-ऑफलाइन
अधिकृत वेबसाईट:-अद्याप सुरू नाही.
नीर्धुर चुल योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/nirdhur-chul-yojna/
बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/beti-bachao-beti-padhao-yojna/
Kishori Shakti Yojna Purpose.
किशोरी शक्ती योजना Kishori Shakti Yojna Maharashtra ही राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 11 ते 18 वय वर्ष गटातील किशोरवयीन मुलींसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वकांक्षी योजना आहे.
या योजनेअंतर्गत 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुधारणे, त्यांना पौष्टिक अन्न मिळवून देणे तसेच त्यांना व्यवसायाच्या दृष्टीने सक्षम बनवणे यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत मुलींना त्यांचे आरोग्य, पोषण, कुटुंब कल्याण, व्यक्तिगत स्वच्छता, परिसर स्वच्छता इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात येते.
या योजनेअंतर्गत बालविवाहास प्रतिबंध करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
मुलींना सामाजिक तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे.
मुलींचे शारीरिक व मानसिक दृष्ट्या मुलींना निरोगी बनविणे.
किशोरवयीन मुलींची निर्णया क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने अनौपचारिक शिक्षण देणे.
किशोरवयीन मुलींचा आत्मसन्मान वाढविणे.
किशोरवयीन मुलींना सक्षम बनविणे.
किशोरवयीन मुलींना त्यांच्या विकासासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे.
राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करणे.
किशोरवयीन मुलीच्या वैयक्तिक पोषण आहाराबद्दल तिला जनजागृती करणे.
गृह व्यवस्थापनाबद्दल जनजागृती करणे.
राज्यातील आर्थिक दृष्ट्या घरी कुटुंबातील मुलींचे भविष्य उज्वल करणे.
Kishori Shakti Yojna Benefits.
Kishori Shakti Yojna Maharashtra या योजनेअंतर्गत मुलींचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून त्यांना पौष्टिक अन्न दिले जाते
मुलींची रक्त तपासणी केली जाते.
11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींना अंगणवाडी मार्फत 6 महिन्यातून एकदा जंतनाशक गोळ्या दिल्या जातात.
या योजनेअंतर्गत मुलींचे दर महिन्याला वजन केले जाते.
या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना त्यांची वैयक्तिक स्वच्छता, शिक्षण, मासिक पाळी, गर्भावस्था, गैरसमज, बालविवाहाचे परिणाम यासारख्या आरोग्य विषयाचे प्रशिक्षण दिले जाते.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या मुलींना आठवड्यातून एकदा लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात.
किशोरवयीन मुलींना त्यांच्या पायावर उभा राहण्यासाठी 1 लाखापर्यंतचा खर्च येतो.
मुलींना सक्षम बनविण्यात येते.
Kishori Shakti Yojna या योजनेअंतर्गत मुलींना आत्मनिर्भर बनवता येते.
मुलींना किशोरवयीन वयात योग्य प्रशिक्षण देण्यात येते त्यामुळे 18 वर्षानंतर त्यांना रोजगार देखील दिला जातो.
Kishori Shakti Yojna Features.
किशोरी शक्ती योजना Kishori Shakti Yojna महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
ही योजना किशोरवयीन मुलींसाठी एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील शाळा किंवा महाविद्यालय शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींना शिक्षण, आरोग्य, स्वच्छता तसेच घरगुती व्यवसायिक प्रशिक्षण देण्यात येते.
किशोरवयीन मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यात येते.
या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मुलींची निवड करण्यात येते, त्यातून त्यांना विभागीय पर्यवेक्षण ANM आणि अंगणवाडी सेविकांकडून या मुलींना प्रशिक्षण देण्यात येते.
महिला व बालविकास विभागामार्फत हे प्रशिक्षण देण्यात येते.
मुलींना त्यांच्या शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे वैयक्तिक स्वच्छता, उत्तम स्वयंपाक, स्वयं रोजगार याचे प्रशिक्षण देण्यात येते.
या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुली सशक्त व आत्मनिर्भर बनतात.
किशोरी शक्ती योजनेची Kishori Shakti Yojna अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे कुठल्याही अडचणीचा सामना मुलींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी करावा लागत नाही.
Kishori Shakti Yojna Maharashtra Benefits.
किशोरी शक्ती योजनेअंतर्गत Kishori Shakti Yojana प्रत्येक महिला महिन्याला किशोरवयीन मुलींचे वजन करण्यात येते.
मुलींना आठवड्यातून एकदा लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात.
मुलींना 6 महिन्यातून एकदा जंतनाशक गोळ्या दिल्या जातात.
किशोरवयीन मुलींचे रक्त तपासून त्यांचे हिमोग्लोबिन तपासले जाते.
किशोरवयीन मुलींना त्यांच्या वैयक्तिक स्वच्छते बद्दल प्रशिक्षण दिले जाते.
मुलींना त्यांच्या योग्य वयात प्रशिक्षण दिल्यामुळे मुली 18 वर्षाची झाल्यानंतर तिला स्वयंरोजगार देखील देण्यात येतो.
किशोरवयीन मुलींना त्यांचे आरोग्य, पोषण, शिक्षण आणि त्यांचे कौशल्य याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येऊन मुली आत्मनिर्भर बनतात.
Kishori Shakti Yojna 2024.
Kishori Shakti Yojna Maharashtra.
ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक क्षेत्रातून 11 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींची निवड करण्यात येते. या मध्ये एकूण 20 मुलींची निवड होते. या मुलींची 6 महिन्याकरिता निवड करण्यात येते. त्यापैकी 15 ते 18 वयोगटातील किशोरवयींची मुलींची निवड ही दारिद्र रेषेखालील कुटुंब, अनुसूचित जाती, जमाती मधून केली जाते. या मध्ये मधूनच मुलींनी शाळा सोडलेल्या मुलींना प्राधान्य देण्यात येते. यापैकी 3 मुलींना अंगणवाडी केंद्राशी जोडण्यात येते, त्यांना अंगणवाडीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करण्यात येते. या योजनेअंतर्गत मुलींची निवड ही बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते.
Maharashtra Kishori Shakti Yojna Eligibility.
किशोरी शक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील किशोरवयीन मुलींना लाभ घेता येतो.
श्रावण बाळ योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/shravan-bal-yojna/
SBI स्त्री शक्ती योजनेच्या माहितीसाठी येथे क्लिक करा https://hellomarathi.org/sbi-stree-shakti-yojna/
Maharashtra Kishori Shakti Yojna Training.
मेहंदी काढणे
अकाउंटिंग
केक बनविणे
कचऱ्यातून कला
जैविक शेती
गांडूळ खत तयार करणे
घरगुती विजेच्या उपकरणाची दुरुस्ती
इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते.
Kishori Shakti Yojna Conditions.
किशोरी शक्ती योजनेचा Kishori Shakti Yojna लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच दिला जाईल.
या योजनेचा लाभ फक्त दारिद्र्य रेषेखालील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींनाच देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरीब, दारिद्र्यरेषेखालील, अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील किशोरवयीन मुली या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
ज्या मुलींचे शाळा किंवा महाविद्यालयीन शिक्षण मधूनच सोडलेले आहे अशा मुलींना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.
किशोरी शक्ती योजनेचा लाभ फक्त 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींनाच घेण्यात येईल.
या योजनेसाठी फक्त 6 महिन्यांसाठीच मुलींना समाविष्ट केले जाईल.
Kishori Shakti Yojna या योजनेअंतर्गत मुलींना लाभार्थी मुलींना कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही.
जी मुलगी सध्या शाळेत शिक्षण घेत आहे त्या मुलीला या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.
अर्जदार मुलीच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा सरकारी नोकरीमध्ये काम करत नसावा.
किशोरी शक्ती योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
Kishori Shakti Yojna Documents
अर्जदाराचे आधार कार्ड
जन्म प्रमाणपत्र
रेशन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
शाळेचे मार्कशीट
जातीचे प्रमाणपत्र
शाळेचा दाखला
लाइट बिल
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो.
Kishori Shakti Yojna Application Form.
Kishori Shakti Yojna किशोरी शक्ती योजनेचा अर्ज हा तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. याचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कुठलीही अधिकृत वेबसाईट सध्या उपलब्ध झालेली नाही.
या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला तिच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा लागेल.
त्यानंतर त्यांच्या अंगणवाडी केंद्रातून या योजनेसाठी अर्ज घ्यावा लागेल.
तो अर्ज घेऊन संपूर्ण अर्ज अचूकपणे भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील.
त्यानंतर हा फॉर्म अंगणवाडीत जमा करावा लागेल.
त्यानंतर अंगणवाडी सेविका तुमच्या अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी करतील.
त्यानंतर स्थानिक बालिका मंडळाद्वारे लाभार्थी मुलीची निवड केली जाईल.
किशोरी शक्ती योजनेअंतर्गत Kishori Shakti Yojna पात्र असलेल्या मुलींची निवड करण्यासाठी महाराष्ट्रातील अंगणवाडी केंद्राशी संबंधित असलेल्या अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील त्यानंतर किशोरवयीन मुलींची निवड केली जाईल.
या योजनेअंतर्गत नोंदणी केल्यानंतर लाभार्थी मुलीला किशोरी कार्ड देखील मिळेल.
या कार्डमार्फत तिला किशोरी शक्ती योजनेचे लाभ मिळतील.
अशा अत्यंत सोप्या ऑफलाइन पद्धतीने या योजनेचा अर्ज करून लाभ मिळवू शकता
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
प्रश्न: किशोरी शक्ती योजना कोणत्या राज्यासाठी आहे?
उत्तर: किशोरी शक्ती योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी लागू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
प्रश्न: किशोरी शक्ती योजनेचे कोणाला मिळतो लाभ?
उत्तर: किशोरी शक्ती योजनेचा महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील किशोरवयीन मुलींना मिळतो.
प्रश्न: किशोरी शक्ती योजनेचे काय आहेत लाभ?
उत्तर: किशोरी शक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी मुलीला तिच्या वैयक्तिक आरोग्य, शिक्षण, स्वच्छता याबद्दलचे प्रशिक्षण देण्यात येते.
प्रश्न: किशोरी शक्ती योजनेचा कसा करावा अर्ज?
उत्तर: किशोरी शक्ती योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागतो.